जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आ.आशुतोष काळे यांची..या बँकेवर बिनविरोध निवड

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्वपूर्ण म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती पूरक मतदार संघातून कोपरगावचे आ.व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे जिल्ह्यातून बिनविरोध निवड झाली आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंडळाच्या निवडणुकीच्या शेतीपूरक मतदार संघातून आ.काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होवून शेतीपूरक मतदार संघातून देखील आ.आशुतोष काळे यांच्या अर्जासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून विक्रमी ३६ अर्ज दाखल करण्यात आले होते.या मतदार संघातून एकूण ८३२ सभासदांना मतदारांचा अधिकार होता.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसा पर्यंत एकून ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शेतीपूरक मतदार संघातून आ. काळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी असलेल्या शेतीपूरक मतदार संघातून त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होवून त्यांची जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

आ.काळे यांची बिनविरोध निवड होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे,आ.लहू कानडे,चंद्रशेखर घुले,आ.नरेंद्र घुले,पांडुरंग अभंग, राजेद्र नागवडे,राजेंद्र फाळके,माजी आ.अशोक काळे,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे,आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बी.बी.सय्यद आदी पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close