खेळजगत
शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद- डॉ.फुलसौंदर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी या ग्रामीण भागात क्रीडा व धार्मिक क्षेत्रातील विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविणारे शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हनुमान मंदिर मैदानावर शिवसुत्र युवा प्रतिष्ठान वतीने प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यास्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर,श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी अजिंक्य ढाकणे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध तोडकर,मेजर धनराज चव्हाण यांचे शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला त्या वेळी ते बोलत होते.
या स्पर्धत पहिले बक्षीस २१ हजार रू. व सन्मानचिन्ह वैद्यकीय अधीकारी डॉ. फुलसंदर,दिपक गायकवाड,तुषार गुरसळ, आनंदा देवकर यांच्या हस्ते डी सरकार संघास देण्यात आले.तर दुसरे बक्षीस ११,०००-रु व सन्मानचिन्ह डॉ.आजिक्य ढाकणे,मेजर धनराज चव्हाण,पो.बाळासाहेब गायकवाड, दादासाहेब चव्हाण , बापु वक्ते,यांच्या हस्ते समुद्धी इंजिनीयर देण्यात आले .
तिसरे बक्षीस ७.०००-रु व सन्मानचिन्ह डॉ अनिरुध्द तोडकर ,गिरधर गुरसळ , नारायण गुरसळ ,विजु सोळके, जालिंदर चव्हाण ,
यांच्या हस्ते हरेगाव संघास देण्यात आले .
चौथे बक्षीस ५,०००-रु व सन्मानचिन्ह मेजर धनराज चव्हाण ,संजय वक्ते ,करणा वक्ते, किरण वक्ते ,
यांच्या हस्ते फेन्ड्स ११ संघास देण्यात आले .
खेळाडु रवि कोते यांस उत्कृष्ठ खेळाडू बक्षीस ११००रु सन्मानचिन्ह विक्रम चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले .
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य ढाकणे म्हणाले, साईबाबांनी सेवा हा धर्म सांगितला आहे तो विचार युवकांनी अंगी करून अंगीकारून मनुष्याने सेवाव्रती होण्याची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध तोडकर म्हणाले, प्रत्येक तरुणाने व्यसनाधीन न होता चांगले विचार चांगले गुण आत्मसात करून शरीर निरोगी ठेवण्यास प्रयत्न करावे.
युवकांना भविष्यासाठी प्रोत्साहन देणारे प्रसिद्ध हिंदी समालोचक मेजर धनराज चव्हाण यांनी राष्ट्र विचारांनी युवकांना प्रेरित केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक गायकवाड,पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड,किशोर गायकवाड,आनंदा देवकर ,दादासाहेब चव्हाण,संतोष चव्हाण,बापू वक्ते, गिरधर गुरसळ, नारायण गुरसळ, विजू सोळके, संजय वक्ते, करणा वक्ते, किरण पाटीलबा वक्ते, रावसाहेब वक्ते, अशोक राऊत, विलास गिरमे, रामभाऊ वक्ते, दादासाहेब वक्ते,मधुकर वक्ते,चंद्रकांत वक्ते,अजय गुरसळ, अक्षय वक्ते, निखिल राऊत,पप्पू इंगळे, सुधाकर होन, संजय भोंगळे, संजय वक्ते, धोंडीराम वक्ते, कुलदीप वक्ते, शशिकांत गुरसळ, विश्वजीत वक्ते, ऋषिकेश गुरसळ, विकी जगताप, सौरभ पवार, रोहित जावळे, शिवसूत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर वक्ते, उपाध्यक्ष विशाल गुरसळ, गोरख चव्हाण, पाटीलबा वक्ते, राहुल वक्ते, राहुल चव्हाण यांचेसह जेऊर कुंभारी ग्रामस्थ व भजनी मंडळ शिवसूत्र युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे सदस्य शिवजागर एक विचारधारा चे सदस्य उपस्थित होते. सामन्याचे धावते समालोचन कैलास गटाने व जालिंदर चव्हाण यांनी केले.