जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात जेष्ठ नागरिकांच्या वतीने पोलिसांना फराळ वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील जेष्ठ नागरिक सेवा मंच महिला समिती व रामू महाराज उपाध्ये यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली निमित्त पोलीस मित्रांना फराळ वाटपाचा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन जेष्ठ नागरिक मंच ने लक्षवेधी काम केले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पश्चिमात्य राष्ट्रांत प्राचीन काळापासून नगरपालिका आणि तत्समान इतर स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्यामुळे कालांतराने पोलीस या शब्दाला आधुनिक अर्थ प्राप्त झाला आहे. लोकांच्या जीवित,वित्तांचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे, घडलेले गुन्हे हुडकून काढून आरोपीला पुराव्यानिशी न्यायासनासमोर हजर करणे, त्यास शासन घडविणे,समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे इ. कामांचा समावेश पोलिसांच्या कर्तव्यांत होतो.मात्र हा घटक दिवसाचे चोविस तास कार्यरत असूनही बऱ्याच वेळा समाजाच्या उपेक्षेचे धनी होतो.या बाबीकडे लक्ष वेधून घेण्याचे काम कोपरगाव जेष्ठ नागरिक संघाने घेतले आहे.

पश्चिमात्य राष्ट्रांत प्राचीन काळापासून नगरपालिका आणि तत्समान इतर स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्यामुळे कालांतराने पोलीस या शब्दाला आधुनिक अर्थ प्राप्त झाला आहे. लोकांच्या जीवित,वित्तांचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे, घडलेले गुन्हे हुडकून काढून आरोपीला पुराव्यानिशी न्यायासनासमोर हजर करणे, त्यास शासन घडविणे,समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे इ. कामांचा समावेश पोलिसांच्या कर्तव्यांत होतो.मात्र हा घटक दिवसाचे चोविस तास कार्यरत असूनही बऱ्याच वेळा समाजाच्या उपेक्षेचे धनी होतो.या बाबीकडे लक्ष वेधून घेण्याचे काम कोपरगाव जेष्ठ नागरिक संघाने घेतले आहे.जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष स्व.भागचंद ठोळे व दगडूशेठ उपाध्ये यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर या उपक्रमाची सुरुवात केली आहे.सामान्य जनतेच्या वित्त व जीवित मालमत्तेचे रक्षण करताना या घटकांचे स्वतःकडेही दुर्लक्ष होते हि उणीव भरून काढण्यासाठी जेष्ठ नागरिक मंचाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या वेळी कार्यक्रमाचे स्वागत रेल्वे स्थानक प्रमुख सिन्हा,व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी केले तर जेष्ठ उद्योजक कैलास ठोळे व चंद्रकांत ठोळे यांच्या हस्ते या फराळाचे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

सदर प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, उत्कृभाई शहा, रामू उपाध्ये, श्रीमती उपाध्ये,रजनीताई गुजराथी,शैलजा रोहोम, पेंटर दारुवाला,सुद्धाप्पा कुलकर्णी,छायाचित्रकार हेमचंद्र भवर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close