जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेचा पहिल्यांदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषदेने पाहिल्यांदाचं तुरटीची गणेश मूर्ती बसवून पर्यावरणाला पूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.देशात वर्तमान स्थितीत पर्यावरणाचा प्रश्न गंभीर रूप घेऊन उभा आहे.देशातील नदी,नाले, दुर्गंधीने भरून गेले आहे.शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहेत.मात्र यावर कोणीही कृती करण्यास तयार मात्र नाही.हे सार्वजनिक चित्र आपल्याला पाहायला मिळत असताना याला कोपरगावची नगरपालिका अपवाद ठरली आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे एक वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातून बदलून आलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी मात्र नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला असून या वर्षी प्रथमच तुरटी पासून बनवलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

यासाठी त्यांनी जळगाव येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे कारागीर प्रीतम महाजन या मुर्तीकाराची मदत घेतली आहे.त्यानीं तुरटीपासून अत्यंत आकर्षक मूर्ती बनवल्या आहेत.या मूर्ती त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ पाचशे रुपयांना विकल्या असून जवळपास पंचवीस ते तीस मूर्ती नागरिकांनी खरेदी करून प्रतिसाद दिला आहे.

या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होणार नसून उलट पाण्याचे शुद्धीकरण होणार आहे.कारण पाण्याला तुरटी हि शुद्ध बनविण्याचे महत्वाचे काम करते हे सर्वज्ञात आहे.पाण्यातील धूलिकण शोषून घेण्याचे काम तुरटी करत असते त्यामुळे पाणी शुद्ध होण्यास मदत होत असते.

या गणेश मूर्तीमुळे कोपरगाव परिसरात पाण्याचे प्रदूषण होणार नसून उलट पाण्याचे शुद्धीकरण होणार आहे.कारण पाण्याला तुरटी हि शुद्ध बनविण्याचे महत्वाचे काम करते हे सर्वज्ञात आहे.पाण्यातील धूलिकण शोषून घेण्याचे काम तुरटी करत असते त्यामुळे पाणी शुद्ध होण्यास मदत होत असते.अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.

त्या मुळे नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या मूर्तीची प्रतिष्ठापना नुकतीच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते नगरपरिषद कर्मचारी यांनी केली आहे.त्यावेळी उपमुख्याधिकारी विश्वास गोर्डे, सोपान शिंदे,चंद्रकांत साठे,संजय तिरसे.कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.कोपरगाव नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close