जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोकमठाण येथे गोदावरीत पोहण्यास गेलेला तरुण बेपत्ता !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या तीन तरुणांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बहादूरणा येथील मजुरी करण्यासाठी आलेला एक तरुण वेणूदास कवडू कोसरे (वय-30)हा सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान वाहून गेला असल्याची माहिती त्याचा मित्र प्रकाश पेंदोसे व अंकुश आत्राम यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन दिली आहे त्यामुळे कोकमठाण परीसरात खळबळ उडाली आहे.कोकमठाण हद्दीत त्याच गावातील एका तरुणाने कृषिपुरक व्यवसाय काही वर्षापूर्वी सुरु केला असून त्यांचा मक्यापासून तयार केलेला सर्व माल निर्यात होत असतो. त्यांना स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून मजूर आणलेले आहेत. मात्र वर्तमानात पुरेशी मका उपलब्ध नसल्याने या मजुरांना बऱ्याच वेळा सुट्टीच असते.त्यामुळे या मोकळ्या वेळेत नदीला पाणी असल्याने मयत वेणूदास कॊसरे ,प्रकाश पेंदोसे,अंकुश आत्राम आदी तिघे कोकमठाण घाट येथे सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान येथे पोहण्यास गेले होते.तथापि मयत तरुण हा सूर मारून नदीच्या खोल प्रवाहात गेला असता त्या प्रवाहाला तोडून तो परत येऊ शकला नाही व तसाच पुढे वाहत गेला त्याला उपस्थित मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात ते अपयशी ठरले व त्यांनी घराककडे धाव घेऊन हि बाब आपल्या मजूर ठेकेदारांच्या लक्षात आणून दिली मात्र तोवर फार उशीर झाला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून ठेकेदाराने कंपनी मालक थोरात यांच्याशी संपर्क साधून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात समक्ष येऊन तक्रार दाखल केली असून कोपरगाव शहर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close