जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांची व्यापाऱ्यांना अरेरावी !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात कोपरगाव नगर पालिकेने प्लास्टिक वापरावर जप्तीच्या कारवाया केल्या.या कारवाया करताना एकावेळी १० ते १२ नगर पालिकेचे कर्मचारी दुकानात घुसून त्यांनी अरेरावीची व दमदाटीची भाषा करून असभ्य वर्तन केले असून ज्या व्यापाऱ्यांचे दुकानात ५० मायक्रोच्या पुढच्या पिशव्या आहेत त्या जप्त केल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा व्यापारी महासंघाने केला आहे.

वर्तमानात कोपरगावात नगरपरिषदेची नागरी स्वच्छता अभियानाची पूर्व तयारी सुरु आहे.या पार्श्वभूमीवर शहरात पन्नास मायक्रोच्या आतील प्लाष्टीक इशव्या वापरास पालिकेने बंदी आणली आहे.त्या अंतर्गत पालिकेची वर्तमानात कारवाई सुरु आहे.मात्र त्याला कोपरगाव व्यापारी असोसिएशनने हरकत घेतली असून नगरपरिषद कर्मचारी हि कारवाई करताना अरेरावी करत असल्याचा आरोप केला आहे.हे कर्मचारी व्यापाऱ्यांचे दुकानात दंडाच्या पावत्या फेकत असत अरेरावीची भाषा करत आहे.व्यापाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु हे कर्मचारी ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते.महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केली याचे आम्ही सर्व व्यापारी समर्थन करतो.परंतु व्यापारी ५० मायक्रोच्या पुढे पिशव्या वापरात असतानासुद्धा त्यांचेवर अरेरावीची व दमदाटी केल्याचा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे वतीने निषेध नोंदविण्यात येत असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले आहे.व्यापारी ५० मायक्रोच्या पुढील पिशव्या वापरतील परंतु भाजीपाला फळे विक्रेते,चहा विक्रेते अशा किरकोळ विक्रेत्यांना ५० मायक्रोच्या पिशव्या वापरणे परवडणारे नाही.या बाबतीत शासनाने देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा.तसेच कोपरगाव नगरपालिकेने देखील हा पर्याय उपलब्ध करण्यास पुढाकार घेतल्यास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यात सहकार्य करण्यास तयार आहे.

कोपरगाव शहरात व्यापारी महासंघ वतीने सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविणे,कोपरगाव शहरातला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तलावातील गाळ काढणे,कोरोनाचे काळात अन्नदान योजना राबविणे यांसारख्या अनेक सामाजिक योजनांत नेहमीच पुढाकार घेत असतो.कोपरगाव शहरात खराब रस्ते,प्रचंड धुळीचा त्रास सहन करत व्यापारी वर्ग आपले दुकान चालवत आहे असून व्यापारी कायद्याचे पालन करणार आहोत.कोरोना काळात प्रचंड मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आता कुठे पुन्हा स्थिर स्थावर होत असताना होत असेलेली धडक कारवाई हि व्यापाऱ्यांना जाचक होत आहे.तसेच व्यापारी वर्गानेही ५० मायक्रो पेक्षा खाली कॅरी बॅगा वापरू नये असे हि आवाहन व्यापारी महासंघाचे वतीने शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close