जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात महिलेस औषध पाजून मारल्याचा गुन्हा दाखल,तीन अटक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील सासर तर मनमाड येथील माहेर असलेल्या चित्रा परेश गोसावी (वय-३५) हिला नुकतेच माहेरून हुंड्यातील एक तोळा सोने, फ्रीज व इलेक्ट्रिक वस्तू आणण्यासाठी माहेरून पैसे आणावे या साठी कायम मानसिक,शारीरिक छळ करून तिचा सासरा पद्माकर वामनगीर गोसावी व अन्य पाच जणांनी शनिवारी औषध पाजून मारून टाकल्याची फिर्याद मनमाड येथील मच्छीन्द्र रघुनाथ सांगळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली असून कोपरगाव पोलिसांनी घरातील सहा आरोपी पैकी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे यांनी “जनशक्तीस न्युज” ला दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,चित्रा परेश गोसावी या तरुणीचे लग्न चार वर्षांपूर्वी कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील परेश पद्माकर गोसावी या तरुणाशी लावून देण्यात आले होते.सुरुवातीचे नव्यानवलाईचे नऊ दिवस निघुण गेल्यावर त्यांच्यात हुंड्याच्या देवाण घेवाणीवरून कुरबुरी सुरु झाल्या तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार ती सासरी नांदत असताना तिने माहेरून हुंड्यापोटी राहिलेले एक तोळा सोने ,तसेच घरात फ्रीज,व इलेक्ट्रिक वस्तू आणाव्या यासाठी तिला वेळोवेळी मारहाण,शिवीगाळ,दमदाटी,करण्यात येत होती.तिचा शारीरिक ,मानसिक छळ करण्यात येत होता.तिला अखेर सतरा ऑगष्ट रोजी सासरा पद्माकर गोसावी,सासू सरलाबाई उर्फ सरुबाई पद्माकर गोसावी, नवरा परेश पद्माकर गोसावी,गौरी गणेश गोसावी,पमा बापू गोसावी,बापू गोसावी आदींनी मारहाण केली व तिला विषारी औषध पाजले त्यामुळे शनिवार दि.१७ ऑगष्ट रोजी तिचा मृत्यू झाला आहे.अशी फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी या सहा जणांवर गु.र.नं.२८०/२०१९ भा.द. वि.कलम ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सासरा पद्माकर गोसावी, सासू सरलाबाई गोसावी,जाव गौरी गणेश गोसावी आदींना अटक केली असून त्यांना कोपरगाव येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने उक्तीवादानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर नवरा परेश गोसावी,पाम बापू गोसावी,बापू गोसावी हे तिघे अद्याप फरार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.व पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी मच्छिद्र सांगळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close