जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सरकारी कामात अडथळा,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायत हद्दीत ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले ग्रामसेवक प्रकाश जाधव हे ग्रामसभेत एका विषयाचे वाचन करत असताना त्यांना त्यास हरकत घेऊन काम बंद करून धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपी इसम दीपक प्रकाश चौधरी याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने कान्हेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामसभेत ग्रामसेवक जाधव हे काल सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास विषय क्रं.५ वाचत असताना सदर ग्रामसभेत एक ग्रामस्थ दीपक प्रकाश चौधरी हा बसलेल्या जागेवरुन उभा राहून जोरजोरात आरडाओरडा करत बोलू लागला कि,”हे ग्रामसभेचे कामकाज बंद करा,तुमचे आतापर्यंत खूप नाटक झाले” असे अरेरावीने बोलून,”ह्या नंतर तुला गावात पाय ठेवू देणार नाही,तुझी बदली करतो” असे म्हणून ग्रामसभेत गोंधळ घातला आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,”फिर्यादी हे धारणगाव रोड कोपरगाव येथील रहिवासी असून ते कान्हेगाव येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे.कान्हेगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच यांनी काल शुक्रवार दि.२५ रोजी सकाळी११ वाजता आयोजित केली होती.सदर ग्रामसभेस सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायतीचे सदस्य,तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी व सदस्य व अनेक ग्रामस्थ हजर होते.

सदर ग्रामसभेत ग्रामसेवक जाधव हे सदर ग्रामसभेत सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास विषय क्रं.५ वाचत असताना सदर ग्रामसभेत एक ग्रामस्थ दीपक प्रकाश चौधरी हा बसलेल्या जागेवरुन उभा राहून जोरजोरात आरडाओरडा करत बोलू लागला कि,”हे ग्रामसभेचे कामकाज बंद करा,तुमचे आतापर्यंत खूप नाटक झाले” असे अरेरावीने बोलून,”ह्या नंतर तुला गावात पाय ठेवू देणार नाही,तुझी बदली करतो” असे म्हणाला असता आपण त्यास,”त्याचे म्हणणे काय आहे ? अशी विचारणा केली असता त्याने,शिवीगाळ करत आपल्याकडे धावत येऊन,”माझे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला मुरूम का टाकला नाही ? अशी विचारणा केली आहे.त्यावर आपण निधीच्या कमतरतेमुळे सदर काम करता आले नाही,नजीकच्या काळात निधी उपलब्ध झाले नंतर आपण सदरचे काम करू” असे उत्तर दिले आहे.तरीही त्याने उद्धटपणे बोलून आपल्याला धमकी देत होता.दरम्यान या गोंधळात सरपंच संगीता काचेश्वर आहेर व उपसरपंच आप्पासाहेब नीलकंठ काजळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विशाल मुकुंद पांडव,प्रदीप अशोक हिरवळे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बंकट विश्वनाथ जगताप यांनी त्यात मध्यस्ती करून त्यास शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही त्या प्रकरणी दाद दिलीं नाही.व ग्रामसभेचे कामकाज बंद पाडले आहे.व ग्रामपंचायत कर्मचारी पांडव यास धमकावून त्याकडून ग्रामपंचायतीच्या लोखंडी शटरच्या कुलुपाची चावी घेऊन त्याने ग्रामपंचायतीचे लोखंडी गेट बंद करून तो शिवीगाळ करत निघून गेला आहे.

दरम्यान फिर्यादी ग्रामसेवक जाधव यांनी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचेकडे धाव घेऊन याबाबत त्यांना सदर घटनेची कल्पना दिली आहे.व त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.४७२/२०२२ भा.द.वि.कलम ३५३,३४१,१८६,५०४,५०६, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजू चव्हाण हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close