कोपरगाव तालुका
उद्योजक राजेंद्र शिरोडे यांना मातृशोक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव (प्रतिनिधी ) कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी व काशिको ट्रेडींग कंपनीचे संचालक व राजेंद्र शिरोडे यांच्या मातोश्री श्रीमती सुंदराबाई काशिनाथ शिरोडे यांचे अल्पशा आजाराने रविवारी (दि. ११) रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक व नागरीक मोठ्या संख्येने साप्रसंगी उपस्थित होते.
श्रीमती सुंदराबाई या अतिशय धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या काशिनाथ शिरोडे ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गोरगरीब, वंचित लोकांना आर्थिक मदत केली. त्यांचे सामाजिक योगदानही मोठे होते. त्यांच्यामागे प्रकाश, अरुण, अशोक, राजेंद्र ही मुले, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनेकांनी श्रध्दांजलीपर भाषणे करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.