कोपरगाव तालुका
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी) राज्यात नुकत्याच आलेल्या पावसामुळे दक्षिणेतील कोल्हापुर, सांगली, सातारा या पुरग्रस्त जिल्हयातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तेथील गाव, शहर, वस्ती, वाडया यामध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले होते त्यात तेथील बाजारपेठही ठप्प झाली होती.अशा परिस्थीतीत त्यांच्या दोन वेळेच्या जेवणासाठी मदतीचा ओघ संपुर्ण महाराष्ट्रातुन सुरू असतांना कोपरगाव येथील सांची फांऊंडेशन यांच्याकडे कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज महर्षी स्कुलचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या विद्यार्थीही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कोरडा शिधा व दैनंदिन वापरासाठीच्या वस्तुंची मदत ताबडतोब गोळा करण्यात आली व सर्व साहीत्य सांची फांऊडेशनचे संचालीका संगिता मालकर, सुधाभाभी ठोळे, रविंद्र साबळे, हेमचंद्र भवर यांच्याकडे हि मदत विद्यालयाचे विद्यार्थी व प्राचार्य राजेंद्र पानसरे यांच्या उपस्थीतीत सुपुर्त करण्यात आली असल्याची माहीती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.