जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गुन्हेगारी नियंत्रणासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात गुन्हेगारीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला असून असामाजिक तत्वांना चाप लावण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांवर सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावे असे आवाहन नगर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे नुकतीच केली आहे.

कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असून शहरात समाजकंटकांच्या कुरापती वाढल्या असल्याचा घरचा आहेर देऊन या गुन्ह्यांचा तपास लावणेकामी या चलचित्रण कॅमेऱ्यांचा उपयोग होऊ शकतो.त्यामुळे शहरातील मुख्यरस्ते,शहराबाहेर जाणारे रस्ते,मुख्य बाजारपेठ,आदी ठिकाणी कॅमेरे बसवले तर गुन्हा करणाऱ्या असामाजिक तत्वांना चाप बसू शकतो-संदीप वर्पे,जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी.

कोपरगाव शहरात नुकताच सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण व प्रभाग क्रमांक सहा मधील नाथाभाऊ घर ते राममंदिरापर्यंत डांबरीकरण करणे या कामांचा शुभारंभ नुकताच मोठा गाजावाजा करून आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आला होता.त्या वेळी त्यानी एका हिरव्या रंगाच्या फलकाचे अनावरण केले होते.तो फलक काही असामाजिक तत्वांची रात्रीतून हा फलक फाडून टाकला आहे त्याचे पडसाद उमटले असून या गंभीर दखल राष्ट्रवादीच्या शहर व तालुका कार्यकर्त्यानी घेतली आहे.व त्याबाबत पोलिसांना खबर दिली असून या प्रकरणी कारवाईची मागणी काल केली होती.घटनास्थळी राष्ट्रवादीच्या शहरातील कार्यकर्त्यासोबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांचे सहकारी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन कारवाईचे आश्वासन दिले होते.या पार्श्वभूमीवर आज वर्पे यांनी हे निवेदन दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असून शहरात समाजकंटकांच्या कुरापती वाढल्या आहेत.या गुन्ह्यांचा तपास लावणेकामी या चलचित्रण कॅमेऱ्यांचा उपयोग होऊ शकतो.त्यामुळे शहरातील मुख्यरस्ते,शहराबाहेर जाणारे रस्ते,मुख्य बाजारपेठ,आदी ठिकाणी कॅमेरे बसवले तर गुन्हा करणाऱ्या असामाजिक तत्वांना चाप बसू शकतो.व पोलीस यंत्रणेला गुन्हेगारापर्यंत पोहचणे सोपे होऊ शकते असे म्हणून हे चलचित्रण कॅमेरे तातडीने बसवावे अशी मागणीही शेवटी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close