जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रहदारीस अडथळा,कोपरगाव पालिकेने दुकाने हटविली !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील वीर सावरकर सावरकर चौकातील रहदारीस अडथळा ठरत असलेली व रस्त्यावर अतिक्रमण करून सुरु केलेली दुकाने आज कोपरगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पधकाने तातडीने हटवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.अन्य ठिकाणची दुकानेही तातडीने पालिकेने हटवावी अशी मागणी नागरिकानी केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या या मोहिमेत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,प्रभारी मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे, आदिसंह बहुसंख्य कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला आहे.त्यांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.व अन्य ठिकाणची दुकाने हटवावी अशी मागणी केली आहे.

कोपरगावात स्टेशन रोड हा रहदारीस अत्यंत महत्वाचा मानला जातो.विशेषतः पोलीस ठाणे ते बस स्थानक परिसर हा या अतिक्रमण धारकांची शिकार ठरतो हा नेहमीचा अनुभव आहे.मात्र दीपावली कालखंडात,अवैध ठिकाणी आपल्या पथाऱ्या मांडून राहदारीस वेठीस धरण्याचे सध्या पेवच फुटले होते.व अतिक्रमण विरोधी पथकाने आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.बऱ्याच वेळा हे दुर्लक्ष म्हणजे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे हात ओले करण्याचे हक्काचे साधन ठरलेली अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे अनेकांनी या संधीचे सोने न केले तर नवल ! त्यामुळे रहदारीचा श्वास कोंडला जातो व अनेक अपघातांना व कटकटींना निमंत्रण दिले जात असते.मात्र वर्तमान स्थितीत नगपरिषदेच्या नगर अपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कुंभकर्णी झोप उडाली आहे.व आज ते जागे होऊन त्यांनी पहिली कारवाई केली आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरातील अन्य रस्ते हि वाहतूक कोंडीने वैतागले आहे.हा नेहमीचाच खेळ सुरु असतो.आता अन्य ठिकाणची रस्त्यावरील दुकाने व नव्याने केलेली अतिक्रमणे हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या या मोहिमेत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,प्रभारी मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे, आदिसंह बहुसंख्य कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला आहे.त्यांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close