जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टाकळी,रवंदेत आरोग्य तपासणी संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत,प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी,उपकेंद्र रवंदे व ग्रामपंचायत मळेगाव थडी अंतर्गत येथे,सर्दी खोकला,शुगर,ब्लड प्रेशर, तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वपूर्ण आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखूया,असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वपूर्ण आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखूया,असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.व तसे आदेश आरोग्य विभागाला दिले आहे या पार्श्वभामीवर या तपासणीचे आयोजन टाकळी, रवंदे,मळेगाव थडी आदी ठिकाणी केले होते.

सदर शिबिरात एकूण ४० व्यक्तीची ऑंटीजन तपासणी करण्यात आली. त्यात एक स्त्री वय ४३ बाधित आढळून आली आहे.
सदर मोहिमेसाठी रवंदे उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा लिपाने,श्रीमती.डावरे मॅडम,डी.एस.आहेर आरोग्य सहाय्यक,आर.के. ढेपले प्रशासक ग्रामपंचायत,सरपंच गोरख दवंगे,उपसरपंच विलास दवंगे,बी.ओ.पाटील ग्रामसेवक,आशा सेविका संगीता दवंगे,आशाबी पठाण,ग्रामपंचायत कर्मचारी अभिजीत दवंगे,रामदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close