कोपरगाव तालुका
कोपरगावात महिला आघाडीकडून योगी सरकारचा निषेध
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांडाने अवघा देश संतप्त आहे.देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत.याच प्रकरणी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून योगी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
या घटनेने संपूर्ण देश हेलावून गेला असून नराधमांना असे गैरकृत्य करतांना कायद्याचा कुठलाच धाक उरला नसल्याचे जाणवते.पालघर येथील साधूंच्या हत्याकांडा विषयी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे-कलविंदर दडियाल,शहराध्यक्ष कोपरगाव शिवसेना
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्हा भलताच चर्चेत आला आहे.हाथरसमध्ये उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर हे ठिकाण राजकारणाचंही केंद्रबिंदू ठरलं.पोलिसांकडून पीडित कुटुंबीयांना मिळालेल्या वागणुकीनंतर सामान्यांचंही लक्ष या प्रकरणानं वेधून घेतलं. या प्रकरणातील आक्रोश अजून शमलेला नाही त्याचे पडसाद कोपरगाव येथेही उमटले आहे.कोपरगाव शहर शिवसेनेच्या महिला आघाडीने या घटनेचा तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,नगरसेविका वर्षा शिंगाडे,अश्विनी होने,राखी विसपुते,सारिका कुहिरे,सविता साळवे,छाया वाणी,सुरेखा कानडे,गायत्री मोरे,तनुजा वाणी,जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,एस.टी कामगार सेना प्रमुख भरत मोरे, उपशहरप्रमुख विकास शर्मा,आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळूंके आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वाटेल ते बडबड करणारे,मुंबई पोलिस महाराष्ट्राची बदनामी करणारे वाचाळवीर गप्पगार आहेत.गरीब मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारावर काहीच बोलत नाहीत.जणू त्यांची वाचा गेली आहे.ट्विटरवर ट्विट नाही की एका चॅनलवर गलिच्छ आरडाओरड करणाराही गप्पच आहे.या वाचाळवीरांचा आवाज अचानक कोणी बंद केला? असा प्रश्न जनता विचारत आहे.महिला अत्याचाराचा दुर्दैवी प्रकार उत्तरप्रदेशात घडला तो सहन होणारा नाही.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे म्हणाल्या की ही घटना अतिशय निंदनीय आहे व भाजपचे जे भुकणारे कुत्रे आहेत त्यांची जीभ कापल्या गेली का ? स्मृती इराणी या भाजप नेत्या जेथे महिलांवर अत्याचार होतो तेथे जाऊन त्या प्रशासनाला बांगडी चोळीचा आहेर देतात मग या प्रकरणात काय त्यांच्याकडच्या बांगड्या संपल्या का ? संपल्या असेल तर आम्ही त्यांना पैसे देतो पण तिने योगी सरकारला घरचा आहेर द्यावा.सरकारने सर्व महिला अत्याचारातील गुन्हेगारांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी असे आवाहन शेवटी केले आहे.