जाहिरात-9423439946
कृषी विभाग

गतवर्षीची ३.१ कोटींची नुकसान भरपाई मिळणार-आ.काळे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गतवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाईची आकडेवारी निश्चित झाली होती ती ३.१ कोटी रुपयांची रक्कम कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

शेतातील पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन,बाजरी,मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते त्या पिकांना जागेवरच मोड आल्यामुळे त्या पिकांचे देखील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ६ कोटी नुकसान भरपाई मिळावी यासाठी मदत,पुनवर्सन खात्याकडे मागणी केली होती-आ. काळे

मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून गोदावरी नदीला पूर देखील आला होता. त्यामुळे काढणीला सोयाबीन,बाजरी,मका,कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.आ. काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागाला झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शेतातील पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन,बाजरी,मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते त्या पिकांना जागेवरच मोड आल्यामुळे त्या पिकांचे देखील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ६ कोटी नुकसान भरपाई मिळावी यासाठी मदत,पुनवर्सन खात्याकडे आ. काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची महाविकास आघाडी सरकारने दखल घेवून कोपरगाव तालुक्याला पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.कोरोनाच्या संकटात शेतकरी अडचणीत असतांना व मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मागील वर्षीप्रमाणे अतिवृष्टी व पुर येवून मागील वर्षीची पुनरावृत्ती होते कि काय ? या विवंचनेत शेतकरी सापडला असतांना महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close