जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मोकाट जनावरांचा उच्छाद,महिला जखमी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सध्या मोकाट जनावरांनीं उच्छाद मांडला असून आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नगरसेवक जनार्दन कदम यांचे घरानजीक रामदास रजपूत व स्वच्छता कर्मचारी सुमनबाई कुऱ्हाडे या महिलेला शिंगावर घेऊन आपटल्याने त्याना गंभीर दुखापत झाली आहे.या खेरीज अनेकांना या जनावरांचा उपसर्ग पोहचला असल्याने या मोकाट जनावरांचा कोपरगाव नगरपरिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी नगरसेवक जनार्दन कदम यांनी केली आहे.

“नगरपरिषदेने अनेकदा जनावरे पकडून गो शाळेला पाठविले,हजारो रुपये दंड आकारला हे आपणाला माहित आहे कि नाही ?असा सवाल विचारून नगरसेवक म्हणून आपण किती वेळा जनावरांच्या मालकांची नांवे सांगितली ? तुमचेच काही नगरसेवक,”गायी सोडा” असे येऊन सांगतात.सर्व नगरपरिषद करोनाशी लढत आहे,सफाई कर्मचारी रात्रंदिवस कामात आहेत.त्यांनाही मर्यादा आहेत,कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कारही करावे लागतात.आपण जनावरांच्या मालकांची नावे दिल्यास सोपे होईल असे आवाहन करून कदम यांच्या अंगणात आपला चेंडू टोलवाला आहे.व त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार देऊ शकतो,मात्र नांवे कुणीच देत नाही वाईटपणा घेण्याची कोणाची तयारी नाही तरी आपण पुन्हा जनावरे पकडण्याचे आदेश दिले आहे.ते काम सोपे नाही-विजय वहाडणे,नगराध्यक्ष-कोपरगाव नगरपरिषद

कोपरगाव शहरात अनेक मालकांनी आपली गायी व तत्सम जनावरे गावात मोकळी सोडून देऊन त्यांच्या दुधाचा व तत्सम उत्पादने घेऊन या जनावरांना शहरात मोकळी सोडुन देण्याची अघोषित रितच पडली आहे.हि जनावरे ऐन रस्त्यात ठाण मांडतात काही वेळा शहरांतील रस्त्यावर अस्ताव्यस्त बसून अथवा उभे राहून शहरातील दळणवळणास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करतात.अनेक नवशिके दुचाकी व चारचाकी वहाने शिकत असताना त्यांना या मुक्या प्राण्यांचा अंदाज येत नाही.त्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होत असून अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत आहे.मात्र बऱ्याच वेळेला दुर्घटनाग्रस्त नागरिक हे बाहेरील गावचे असतात ते तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही व आपला जीव वाचवला अशा समजात निघून जातात.मात्र अनेकांच्या जीवितावर बेतत आहे.त्यामुळे या बेताल व दुसऱ्याच्या जीवावर आपली पोळी भाजणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे.आज सकाळी सात वाजेच्या सुमारास निवारा परिसरात आधी रामदास रजपूत यांच्यावर या कळपाने हल्ला चढवला व त्यानंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचारी सुमनबाई कुऱ्हाडे,यांच्यावर हल्ला चढवून त्यांना रक्तबंबाळ केले आहे.त्यामुळे या प्रभागातील नगरसेवक जनार्दन कदम यांनी या मोकाट जनावरांचा पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.गत सप्ताहात एका लहान मुलाला मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला फाडण्याचा प्रयत्न केला मात्र नजीकच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्राण वाचला आहे.त्यामुळे नगराध्यक्ष,मुख्याधिकारी,आरोग्य अधिकारी हे नागरिकांच्या जीवित हानीची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विचारला आहे.व या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

“नगरपरिषदेने अनेकदा जनावरे पकडून गो शाळेला पाठविले,हजारो रुपये दंड आकारला हे आपणाला माहित आहे कि नाही ?असा सवाल विचारून नगरसेवक म्हणून आपण किती वेळा जनावरांच्या मालकांची नांवे सांगितली ? तुमचेच काही नगरसेवक,”गायी सोडा” असे येऊन सांगतात.सर्व नगरपरिषद करोनाशी लढत आहे,सफाई कर्मचारी रात्रंदिवस कामात आहेत.त्यांनाही मर्यादा आहेत,कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कारही करावे लागतात.आपण जनावरांच्या मालकांची नावे दिल्यास सोपे होईल असे आवाहन करून कदम यांच्या अंगणात आपला चेंडू टोलवाला आहे.व त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार देऊ शकतो,मात्र नांवे कुणीच देत नाही.कारण कुणाशी वाईटपणा घ्यायचा नाही,कारण मतदार जपायचे ही प्रवृत्ती योग्य नाही.तरीही आपण पुन्हा जनावरे पकडण्याचे आदेश दिले आहे.ते काम सोपे नाही-विजय वहाडणे,नगराध्यक्ष-कोपरगाव नगरपरिषद

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close