निधन वार्ता
उमेश धुमाळ यांना पितृशोक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांचे पिताश्री एकनाथ ग्यानबा धुमाळ (वय- )यांचे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा निष्ठावान सहकारी गमावला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.एकनाथ धुमाळ यांनी आपल्या कुटुंबाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सावरले होते व मुलांना उच्च शिक्षित केले होते.त्यांनी साधारण दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनाच्या सोयाबीनवर व्यापारी आकारात असलेल्या विविध पट्ट्यानां कडाडून विरोध केला होता व्यापारी शेतमाल खरेदी करताना जी उधळपट्टी करत त्या विरोधात बाजार समिती आंदोलन केले होते.त्यांच्या आंदोलनाला त्यावेळी यश आले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे,आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्यावर कोपरगाव अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अंत्यसंकार करण्यात आले.