जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या नगरसेवकांचे ठेकेदारीतील संबंध उघड करु-इशारा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा कायदेशीर असताना ज्यांना जनहिताची कोणतीही काळजी नाही त्यांनी आपल्या चोऱ्या झाकण्यासाठी बेताल आरोप सुरु ठेवल्यास आपल्याला कोल्हे गटाच्या..त्या नगरसेवकांचे ठेकेदारीत कोणाशी व कसे संबंध आहेत ते उघड करावे लागतील असा स्पष्ट इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत केला आहे.त्यामुळे कोल्हे गटाच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरक्षित ०.६५ आर.क्षेत्रावर क्रीडांगण होऊ शकत नाही हे यांना माहिती असताना झोपेचे सोंग घेत आहे.या पूर्वी कोल्हे गटाच्याचे माजी नगरसेवक बबलू वाणी यांचे १० एकरावरील आरक्षण उठवले त्या वेळी त्यांनी आपल्याला किती रक्कम दिली हे जाहीर करावे असे थेट आव्हान देऊन कोल्हे गटाच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे.व नवीन ४२ कोटींचा पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून कोणत्या नेत्याने व विषय समितीच्या सभापती आणि नगरसेवकाने किती रक्कम घेतली हे जाहीर करावयास भाग पाडू नका-नगराध्यक्ष-वहाडणे

कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच दृकश्राव्य पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यात प्रारंभी सहभाग घेऊन नंतर स्थगितीची मागणी कोल्हे गटाने करून नगरपरिषद परिसरात गोंधळ घातला व पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोप करून गोंधळ उडवून दिल्याने हि सभा तब्बल पाच तास चालूनही त्यावर कोल्हे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी काल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या “वसंत स्मृती”या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी हा इशारा दिला आहे.

त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषदेने गत चार वर्षात अत्यंत चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे.शहर स्वच्छता आरोग्य अभियानात देशभरात ३५३ व्या स्थानी असलेली पालिका या वर्षी १६ व्या क्रमांकावर आली आहे.चार वर्षात नागरिकांची पाण्याची कुठलीही टंचाई जाणवलेली नाही.यांच्या काळात नागरिकांना तब्बल २१ ते २५ दिवसांनी पाणी देण्याचे विक्रम नोंदवले आहे.अनेक ठिकाणचे व्हॉल्व्ह दुरुस्ती करण्यात येऊन गळती बंद करण्यात आली आहे.१८ ते २० तास अवैध चालणारे नळांचे पाणी बरेच बंद केले असून उर्वरित पाण्याचा अपव्यय बंद करण्याचे काम सुरु आहे.सध्या पालिका नागरिकांना चार दिवसाआड पाणी देत असून लवकरच तीन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.रस्त्यांची अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लावली आहे.काही नुकत्याच संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेत मार्गी लावली आहेत.आगामी काळात विस्थापितांना टपऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.वर्तमान स्थितीत नागरिक कोरोना साथीच्या संकटांचा सामना करत आहे.त्याना आधार देण्याचे काम पालिका पदाधिकारी व अधिकारी व आरोग्य कर्मचारी रात्रंदिन जीवाची बाजी लावून करत आहे.अनेक प्रतिबंधक फवारण्या व रुग्णांची सेवा सुरु आहे.आशा सेविकांनी एक हजारांचे मानधन वाढवून तीन हजार रुपये प्रथमच राज्यात केले आहे.सर्व प्रभागात समान पद्धतीने विकास कामे सुरु आहे.असे असताना काहींना आपल्या गावात विधायक होत असल्याने स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पोटदुखी वाढली आहे.व बेताल आरोप-प्रत्यारोप सुरु करून जनतेची करमणूक सुरु केली आहे.ज्यांना विधानसभेत नागरिकांनी आपली जागा दाखवली ते पुन्हा जनतेत विष पेरण्याचे काम करत आहे.वस्तुतः निसर्ग कन्सल्टन्सी कोणी नेमली व कोणी अडचण वाढल्यावर काढली त्याना काढून टाकल्याचे षडयंत्र केले ते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.स्वतःच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अडथळा आल्यावर त्यानां काढून उरबडवेपणा करत असतील तर अशा निर्लज्ज माणसांना उत्तर देण्यात आम्हाला काही हशिल नाही.

ज्या सावकारी नगरसेवकांमुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या तेच आज उजळ माथ्याने शहरात फिरत असून त्याना पाठीशी घालणारे नेते काय लायकीचे आहेत ते या मुळे उघड झाले आहे.विशेष म्हणजे हि आज आरोप करणारी मंडळी आत्महत्या करणाऱ्यांच्या बरोबर चोवीस तास राहत होती व त्यांच्या पठाणी व्याजाच्या धमक्यांनीच या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

पाच क्रमाकांच्या तलावात कोणी अडथळे आणले व कोणी त्या ठेकेदाराला काम बंद पाडण्यास सांगितले ते सर्व उघड होऊन त्याची किंमत त्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत चुकवली आहे.५ नोव्हेम्बर २०१८ ला आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे गेलो त्यांनी हा तलावाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचा दावा करून त्यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना फैलावर घेताना ज्या सावकारी नगरसेवकांमुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या तेच आज उजळ माथ्याने शहरात फिरत असून त्याना पाठीशी घालणारे नेते काय लायकीचे आहेत ते या मुळे उघड झाले आहे.विशेष म्हणजे हि आज आरोप करणारी मंडळी आत्महत्या करणाऱ्यांच्या बरोबर चोवीस तास राहत होती व त्यांच्या पठाणी व्याजाच्या धमक्यांनीच या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. व त्या बाबत गरज पडली तर आपण नावे उघड करू असा इशारा दिला आहे व या बेताल आरोप करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की,आरक्षित ०.६५ आर.क्षेत्रावर क्रीडांगण होऊ शकत नाही हे यांना माहिती असताना झोपेचे सोंग घेत आहे.या पूर्वी कोल्हे गटाच्याचे माजी नगरसेवक बबलू वाणी यांचे १० एकरावरील आरक्षण उठवले त्या वेळी त्यांनी आपल्याला किती रक्कम दिली हे जाहीर करावे असे थेट आव्हान देऊन कोल्हे गटाच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे.व नवीन ४२ कोटींचा पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून कोणत्या नेत्याने व विषय समितीच्या सभापती आणि नगरसेवकाने किती रक्कम घेतली हे जाहीर करावयास भाग पाडू नका व विरोधासाठी विरोध करू नका अन्यथा त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लावावे लागतील असा इशारा शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close