जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या विद्यालयात ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहरांतील सर्वात जुन्या व शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ५ सप्टेंबर डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.’शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.आपल्या गुरू,शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स.१९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे.या दिवशी इ.स. १९६७ मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी “शिक्षकांचा दर्जा” या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. एज्युकेशन इंटरनशनल या संघटनेतर्फे सुद्धा हा दिवस जगभर पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.या दिवशी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.सालाबादप्रमाणे या वर्षीही कोपरगावातील

श्री.गो.विदयालयात डाॕ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले.या वेळी समता पतसंस्थेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर आणि उपस्थित शिक्षकांचा समता पतसंस्थावतीने सत्कार केला आहे.शिक्षक विदयार्थीं घडवतांना पुर्ण मेहनत घेतात.संस्कार घडवतात व त्यातुनच विदयार्थीचे जीवन यशस्वी होते.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातुन घडलेल्या विदयार्थीमध्ये कुलगुरु पासुन ते आदर्श शिक्षकांची मोठी परंपरा आहे व हे विदयार्थी देश पातळीवर शाळेचे नांव उंचावत आहे असे त्यांनी सांगितले.समताचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मी या शाळेचाच विदयार्थी असुन शाळेतील संस्कारामुळेच मी घडलो असे सांगितले.या प्रसंगी पुणे येथील स्मिता दोडमिसे आणि गोवा येथुन बिटचे प्रा.धनंजय कुलकर्णी,आदी माजी विदयार्थीनी चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.रवी पाटील यांनी स्वागत केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरे एस.डी यांनी केले . या कार्यक्रमाला गायकवाड आर.बी.तुपसैंदर डी.व्ही,व्ही.एन.कार्ले,एन.के.बडजाते,जाधव ई.एल,आदी शिक्षक,तसेच समता पतसंस्थेचे अक्षय कुलकर्णी,संजय पारखे,अर्जुन लोहकरे सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close