जाहिरात-9423439946
अपघात

अपघातात एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर पोहेगाव-शहापुर शिवारात मोटारसायकल व टेंम्पोचा अपघात झाला असुन या अपघातात एक जण जागीच ठार झाला असुन एक जण गंभिर जखमी झाला आहे.ही घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-शहापुर शिवारात आल्यावर त्यांच्या मोटारसायकलला कोपरगावच्या दिशेने जाणा-या टेंम्पोने (क्रमांक एम.एच.१४ जे.एल.०७४४) जोराची धडक दिली होती.त्यात लक्ष्मण तळेकर हे जागेवरच ठार झाले आहे.


  
   दरम्यान या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण मोतीराम तळेकर असे आहे.येवला तालुक्यातील अनकुटे येथिल लक्ष्मण मोतीराम तळेकर व अशोक भिकाजी तळेकर हे अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे यात्रेसाठी बजाज कंपनीची सी.टी १०० मोटारसायकलवर (क्रमांक एम.एच.१५ जी.सी.०४९३ ) चालले होते.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-शहापुर शिवारात आल्यावर त्यांच्या मोटारसायकलला कोपरगावच्या दिशेने जाणा-या टेंम्पोने (क्रमांक एम.एच.१४ जे.एल.०७४४) जोराची धडक दिली होती.त्यात लक्ष्मण तळेकर हे जागेवरच ठार झाले तर अशोक तळेकर जखमी झाले आहे.

   दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या इस्माना स्थानिकांनी  रुग्णवाहीकेने शिर्डी येथे रुग्णालयात पाठविले.अपघातानंतर टेंम्पो चालकाने त्या ठिकाणाहुन पळ काढला मात्र शहापुर व पोहेगावच्या युवकांनी त्यास पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.शिर्डी पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close