जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्किन डिसीज आजाराने पशुपालक चिंतेत !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूज सेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परंतु या संक्रमणाची वेळीच दखल घेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास शंभर टक्के धोका टळू शकतो असे आवाहन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले आहे.

लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना ( गाई, वासरे, कालवडी, बैल ) होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणुमुळे हा आजार बळावतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात.

लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना ( गाई, वासरे, कालवडी, बैल ) होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणुमुळे हा आजार बळावतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात. दमट वातावरणामध्ये जेव्हा किटकांची मोठ्या प्रमाणावर वाढ होते त्या दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो. विषेशतः चावणाऱ्या माशा , डास, गोचीड, वेगवेगळे किटक यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत पोहोचतो. हिवाळ्यात मात्र थंड वातावरणामध्ये रोगाचा प्रसार कमी होतो. लम्पी रोगामुळे जनावरांच्या मरतूकीचे प्रमाण नगन्य
असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होते. जनावरांची कार्यक्षमता खालावली जावून काही वेळा गर्भपातही होतो. प्रजनन क्षमतेत घट होते. गाभन जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची अधिक शक्यता असते.
लम्पी या विषाणुचे संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यापर्यंत ते जनावरांच्या रक्तामध्ये राहते. रक्तामधून मग शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होत जाते. प्रथम जनावरांच्या नाका डोळ्यांमधून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो. दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू १० ते १५ मि. मी. व्यासाच्या गाठी तयार होतात. काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे चारा चघळण्यास त्रास होतो, सांधे व पायामध्ये सूज येवून जनावरे लंगडतात. नाकातील श्राव, डोळ्यातील पाणी आणि तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाण्यात ते मिसळते. यातूनही इतर जनावरांना संक्रमण होण्याचे प्रमाण अधिक असते. लम्पी स्कीन हा आजार झुनोटीक रोग प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी या आजाराला मुळीच घाबरुन न जाता जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून जनावरांना औषधोपचार करुन घ्यावा, जनावरांचे गोठे मुक्त व स्वच्छ ठेवावेत, किटक प्रतिबंधक औषधांची वेळच्यावेळी फवारणी करावी, बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे अशा उपाययोजना वेळच्यावेळी केल्यास रोगाचा संसर्ग टाळण्यास चांगली मदत होऊ शकते. या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पशुधन विकास अधिकारी
तसेच बायफ संस्थेचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांनी या रोगासंदर्भात पशुपालकांना मार्गदर्शन व मदत
करण्याची गरज आहे. कोरोना विषाणुमुळे आधीच विस्कळीत झालेली दुग्ध व्यवसायाची घडी लम्पी स्कीन आजारामुळे अजून विस्कळीत होऊ नये याची पशुपालकांनी खबरदारी घ्यावी व या संसर्गाचा मुकाबला करुन जनावरे सुरक्षित ठेवावीत असे आवाहनही राजेश यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Close