कोपरगाव तालुका
..या बँक तर्फे कर्ज वितरणास प्रारंभ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकरी व लघु उद्योजक यांना बँक ऑफ इंडिया कोपरगाव शाखेने कर्ज वित्त पुरवठा करून आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न चालविला आहे,बँकेने कागदपत्रांची पूर्तता करताच आठ दिवसात सदर उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देऊन कामगिरी बजावल्याचे प्रतिपादन श्री.साईबाबा संस्थान चे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी नुकतेच केले आहे.
बँकेच्या वतीने उद्यमी महोत्सवात ३४ छोट्या उद्योजकांना एसएमई योजने द्वारे ४५ लाख ५२ हजार रुपयांचे कर्ज वितरण श्री खांबेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीमती.शीतल मतकर यांनी बँकेने केलेल्या कार्याची माहिती सांगितली आहे.गेल्या महिन्यात १३८ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख ४२ हजार रुपयांचे कृषी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.यापुढेही लघु उद्योजक व शेतकरी यांना कागदपत्रे पूर्तता केल्यास कर्ज वितरण त्वरित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.घर बांधणी कर्ज,वाहन कर्ज व शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर कर्ज ही उपलब्ध करून दिले जात आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक पवन शिंदे,राहुल सूर्यवंशी बँकेचे कृषी अधिकारी मोनाली पाटील,सहाय्यक अरुंधती पाटील व मीनल चौधरी,काका जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.