खेळजगत
कोपरगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुका क्रीडा समिति,अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि अहमदनगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन “राष्ट्रीय क्रीडा दिन”म्हणून कोपरगांव तालुका क्रीडा संकुलात आॕन लाईन पद्धतीने उत्साहाने संपन्न झाला आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते दीलीप घोडके आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे सचिव श्री.मकरंद को-हाळकर यांनी खेळाडु,प्रशिक्षकांना आदींना मार्गदर्शन केले आहे.या नंतर क्रीडाशिक्षक नितीन निकम यांनी सर्वाना क्रीडा दिनाची शपथ दिली.कोरोना आजारामुळे मुळे दिवंगत झालेले कोपरगांव येथील प्रसिद्ध माजी व्हाॕलीबाॕल पटु हीरामण गंगुले यांना या वेळी श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हाचे नुतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतिय आॕलिंपिक असोशिअनचे सहसचिव नामदेवराव शिरगांवकर होते.
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते दीलीप घोडके,अ.नगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे,शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघांचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.कोपरगांव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष धनंजय देवकर यांनी सर्वाचे स्वागत केले.क्रीडा संकुलाचे सचिव राजेंद्र पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.
भारतीय आॕलिंपिक असोशिअनचे सहसचिव नामदेव शिरगांवकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरिल कोरोना आजारा नंतर क्रीडा क्षेत्रातील चालु घडामोडीची माहीती स्पष्ट करुन सर्व खेळाडुंनी आपली स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले.नगर जिल्हातील कोपरगांव चे क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा त्यांनी उल्लेख केला.नुतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी या प्रसंगी सर्वाना शुभेच्छा देवुन खेळाडू,क्रीडाशिक्षकांनी कोराना काळात आपली शारीरिक क्षमता वाढवुन या संकटाचा एकीने मुकाबला करण्याचे सुचित केले.कोरोनाचे संकट दुर झाल्यावर आपण परत जोमाने सर्व मिळुन जिल्हाचा क्रीडाक्षेत्राचा आलेख परत उंच नेऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.अ.नगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष अरूण चंद्रे यांनी संकटाचा सामाना खचुन न जाता करावा असे आवाहन केला आहे.
या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा समितीचे उपाध्यक्ष शिवप्रसाद घोडके यांनी तर आभार कोपरगांव तालुका क्रीडा समिती चे सचिव निलेश बडजाते मानले.
या कार्यक्रमाला सर्व विद्यालयांतील क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक,क्रीडा प्रेमी खेळाडू आॕनलाईन उपस्थित होते.