कोपरगाव तालुका
कोपरगावात गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी तसेच जलप्रदुर्षण होऊ नये यासाठी प्रशासनाने कोपरगाव शहरात १२ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्याचे नियोजन केले असून यावर्षी नागरिकांना थेट नदीत गणेश विसर्जन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
विसर्जन ठिकाणी येताना मात्र एक किंवा दोन व्यक्तीनीच यावे. तसेच नागरीकांनी श्री चे निर्माल्य एक फुल मूर्ती सोबत द्यावे. त्यानुसार विसर्जनासाठी घरगुती गणेशमूर्तीचे संकलन करण्यासाठी भाग निहाय संकलन केंद्रावर दिनांक १ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते दुपारी ३.०० वा. पर्यंत मूर्तीचे संकलन करावे-नगराध्यक्ष वहाडणे
वर्तमानात गणेश उत्सव सुरू असून गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी मंगळवार दि.१ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे.त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेने पूर्व तयारी केली असून गणेश विसर्जनातून जल प्रदूषण होऊ नये या साठी बारा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना पालिकेने जाहीर केल्या आहेत.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,नागरिकांनी श्री ची सर्व पूजा,अर्चना व आरती घरीच करून यावे. मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती संकलित करतांना आरती करू नये. मूर्ती संकलन केंद्र येथे मूर्ती देण्यास येतांना मिरवणूक काढू नये. याठिकाणी येताना मात्र एक किंवा दोन व्यक्तीनीच यावे. तसेच नागरीकांनी श्री चे निर्माल्य एक फुल मूर्ती सोबत द्यावे. त्यानुसार विसर्जनासाठी घरगुती गणेशमूर्तीचे संकलन करण्यासाठी भाग निहाय संकलन केंद्रावर दिनांक १ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते दुपारी ३.०० वा. पर्यंत मूर्तीचे संकलन करावे. इतर निर्माल्ये जसे हार,फुले, दुर्वा इ. आपल्या झाडांना खत म्हणून द्यावे. त्याचे पावित्र्य राखून इतरत्र टाकू नये. सर्व मूर्ती एकत्रित केल्यानंतर नगरपरिषदे मार्फत त्यांचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.
शहरातील मूर्ती संकलन केद्र ठिकाण पुढील लोढा मंगल कार्यालय,गोदावरी पेट्रोलपंप समोर,साईबाबा तपोभूमी मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, आचारी हॉस्पिटल समोर, गोरोबानगर मंदिर, इंडोरगेम हॅाल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरील संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल समोर, माधव बाग, येवला नाका, बेट नाका वरील पैकी नगरीकांना सोयीनुसार जवळील मूर्ती संकलन केंद्रवर मूर्तीचे संकलन करण्यात यावे. कोविड -१९ चे शासनाने विहित केलेले सर्व नियम व शिस्तीचे पालन सर्व नागरिकांनी करून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपाध्यक्ष योगेश बागुल,आरोग्य सभापतीअनिल आव्हाड मुख्याधिकारी प्रशांत सरोदे सर्व नगरसेवक यांनीं केले आहे.