कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरात १.२४ लाखाचा डल्ला,आरोपी फरार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरांतील येवला नाका येथील रहिवासी व शेळीपालन करणारे शेतकरी व्यावसायिक समीर अकबर रंगरेज हे आपला भरणा करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या खंदक नाला शाखेत करण्यासाठी आले असता त्यांना भूल पाडून त्यांच्या खिशातील रोख रक्कम रुपये १ लाख २४ हजार ६०० रुपयांवर अज्ञात चार चोरट्यानी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून त्यास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दुजोरा दिल्याने खळबळ उडाली आहे.या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव शहरात येवला रोड नजीक रहिवासी असलेले फिर्यादी समीर रंगरेज (वय-३६) यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या ताब्यातील रोख रकमेचा भरणा करण्यासाठी ते स्टेट बँकेच्या खंदक नाला परिसरात असलेल्या बँक शाखेत ते सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास गेले असता तेथे काही चार अज्ञात चोरट्यानी त्याना भूल देऊन त्यांच्या कडील बँकेत भरणा करण्यासाठी आणलेली रोख रक्कम रुपये १ लाख २४ हजार ६०० रुपयांवर पाळत ठेवली होती त्यांनी बँकेजवळ आल्यावर त्यांना काही तरी वास देऊन, भूल देऊन त्याना आडमार्गी नेले असावे व त्यानंतर त्यांच्याकडील वरील वर्णनाची रोख रक्कम पळवली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात येवला रोड नजीक रहिवासी असलेले फिर्यादी समीर रंगरेज (वय-३६) यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या ताब्यातील रोख रकमेचा भरणा करण्यासाठी ते स्टेट बँकेच्या खंदक नाला परिसरात असलेल्या बँक शाखेत ते सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास गेले असता तेथे काही चार अज्ञात चोरट्यानी त्याना भूल देऊन त्यांच्या कडील बँकेत भरणा करण्यासाठी आणलेली रोख रक्कम यात ५००,१००,दराच्या नोटा असा रुपये १ लाख २४ हजार ६०० रुपयांचा अवैज पाळत ठेऊन पळवून नेला आहे. त्यांनी बँकेजवळ आल्यावर त्यांना काही तरी वास देऊन,भूल देऊन त्याना आडमार्गी नेले असावे व त्यानंतर त्यांच्याकडील वरील वर्णनाची रोख रक्कम पळवली आहे.घटनेनंतर त्यांना साईबाबा कॉर्नरवर हि बाब लक्षात आली आहे.
तेथे त्यांची काही वेळाने भूल उतरल्यावर त्यांनी आपली रक्कम गेल्याचे जाणवले व त्यांनी लगेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तेथे फिर्याद दाखल केली आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी लगेच खंदक नाला बँकेचे चलचित्रण तपासले असून त्यात त्यांना चार संशयास्पद इसम दिसत आहे. त्यानां फिर्यादीचे ओळखले असून त्यांचे फोटो सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून नागरिकांना त्यांना कोणी ओळखत असेल तर लगेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन केले आहे.या घटनेने कोपरगाव शहर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे.तर पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.५९३/२०२० भा.द.वि.कलम ३९३,३४ प्रमाणे फिर्याद दाखल केली असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.