नगर जिल्हा
रांजणखोल परिसरात अनेक विकासकामे मार्गी
जनशक्ती न्यूजसेवा
रांजणखोल-(वार्ताहर)
भाऊसाहेब जाधव माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांने राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात अनेक विकासाची मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी नुकतेच केले आहे.
राहाता तालुक्यातील रांजणखोल ग्रामपंचायतीच्या परिसरात पेविंग ब्लॉक व पिण्याचे पाण्याच्या जलवाहिणीचा शुभारंभ मुळा-प्रवरा विज संस्थेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी सरपंच ढोकचौळे म्हणाले की,”खा.सुजय विखे,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांचे रांजणखोल गावासाठी कायमच सहकार्य लाभत आहे.रांजणखोल गावात अनेक विकासाची कामे पूर्ण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याप्रसंगी मुळा प्रवरेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे,ऊपसरपंच परविन शेख,ग्रामसेवक बबनराव बहिर,दत्तनगरचे माजी सरपंच पी.एस.निकम,सोसायटीचे अध्यक्ष अशोक ढोकचौळे,पोलीस पाटील कृष्णा अभंग,बाळासाहेब ढोकचौळे,राजु गायकवाङ,निलेश जाधव,सिद्धार्थ बागुल,प्रकाश शिरसाठ,गणेश आवारे,अनिल ढोकचौळे,लक्ष्मण कुलथे,दत्तु अभंग,विक्रम पवार,जाकीर शेख,शकील पठाण,दिलीप लांङगे,सुनिल ढोकचौळे,गंगाधर ढोकचौळे,प्रविण ढोकचौळे,भाऊसाहेब ढोकचौळे यांच्यासह रांजणखोल ग्रामस्थ उपस्थित होते.