नगर जिल्हा
नांदूरखी खुर्द शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

जनशक्ती न्यूजसेवा
नांदूरखी-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्या नजीक असलेल्या नांदूरखी गावात बिबट्याने अंबादास वाणी यांच्या दोन शेळ्या व एक गाय फस्त केली असून गावात अनेक लोकांमध्ये वाड्या वस्त्यांवर भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर घटना घडताच नांदूरखी गावचे व अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हा सचिव आप्पासाहेब वाणी व गावातील नागरिकांनी सदर घटनास्थळी जाऊन भेट दिली तसेच गावातील नागरिकांनी व पोलीस पाटलांनी घटना घडतात डॉ. प्रेरणा पवार वनविभागाचे श्री सुरासे यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस पाटलांना सदर घटनेचा त्वरित पंचनामा करण्यात यावा असे सांगितले आहे.
सदर घटनेचा यावेळी गावातील पोलीस पाटील सोमनाथ वाणी यांनी पंचनामा केला असून गावातील नागरिकांना सतर्कतेचा व काळजी घेण्याचा इशारा केला आहे. सदर घटना घडताच नांदूरखी गावचे व अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हा सचिव आप्पासाहेब वाणी व गावातील नागरिकांनी सदर घटनास्थळी जाऊन भेट दिली तसेच गावातील नागरिकांनी व पोलीस पाटलांनी घटना घडतात डॉ. प्रेरणा पवार वनविभागाचे श्री सुरासे यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस पाटलांना सदर घटनेचा त्वरित पंचनामा करण्यात यावा असे सांगितले आहे. सदरची माहिती वनविभागाला पोलीस पाटील यांनी कळविली आहे.व वनविभागाने लगेच घटनेचा पंचनामा केला आहे.
याभागात बिबट्याचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून त्वरित पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी व गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलिस पाटिल यांनी केली आहे.