जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समृद्धीच्या प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला द्या-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समृद्धी महामार्गावर जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरात अहमदनगर-मनमाड राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या प्रस्तावित सर्कलसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी महसूल विभागाला एका बैठकी दरम्यान दिल्या आहेत.

भाजपने आपल्या राजवटीत मुंबई-नागपूर हा ५३ हजार कोटी रुपये खर्चाचा महात्वांकांशी समृद्धी महामार्ग मंजूर केला होता.मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, ८ पदरी, २१२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल.हा महामार्ग १० जिल्ह्यातून, २६ तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी ५६,००० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हा गतिमार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा,वाशीम जिल्हा अमरावती,वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्ंयातून जाईल. हा १२० मीटर रुंदीचा असेल.यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे.यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही. या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत.या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे,वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य गतिमार्गावरील वाहतूक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसेच स्थानिक जनतेलाही त्यांच्या दळणवळणात महामार्गाचा कोणताच अडथळा होणार नाही, आणि अपघात टाळले जातील. या गतिमार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल,गॅस पाईप लाईन्स आणि वीज वाहतूक करणाऱ्या टाकल्या जाणार आहेत.त्यात कोपरंगावनजीक तीनचारी नजीक एक सर्कल मंजुर आहे.व त्यासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याची माहिती आहे.त्या भूसंपादनासाठी हि बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

जेऊर कुंभारी व कोकमठाण हा परिसर पूर्णपणे बागायती असतांना देखील सात बारा उताऱ्यावर मात्र जिरायती लावण्यात आले आहे. प्रस्तावित सर्कलसाठी ज्यावेळी मोजणी करण्यात आली त्यावेळी सदर शेतामध्ये ऊसाचे पिक होते व आज रोजी त्या शेतात सोयाबीनचे पिक असल्यामुळे जिरायती नोंद न घेता बागायती नोंद घेवून बागायती जमिनीचा दर मिळावा-आ.काळे

या बैठकीसाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,नायब तहसीलदार योगेश कोतवाल,तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,जिनिंग प्रेसिंगचे संचालक सचिन आव्हाड,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, सुनील बोरा,वसंतराव आव्हाड,रामनाथ आव्हाड,विजय रोहोम,डॉ.यशराज महानुभाव,डॉ.ओंकार जोशी आदींसह प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” जेऊर कुंभारी व कोकमठाण हा परिसर पूर्णपणे बागायती असतांना देखील सात बारा उताऱ्यावर मात्र जिरायती लावण्यात आले आहे. प्रस्तावित सर्कलसाठी ज्यावेळी मोजणी करण्यात आली त्यावेळी सदर शेतामध्ये ऊसाचे पिक होते व आज रोजी त्या शेतात सोयाबीनचे पिक असल्यामुळे जिरायती नोंद न घेता बागायती नोंद घेवून बागायती जमिनीचा दर मिळावा.प्रस्तावित सर्कलसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत व त्या शेतकऱ्यांकडे जे एक ते पाच गुंठे जमीन शिल्लक राहत असले तर ती शेतजमीन देखील खरेदी करावी.जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत सर्कलचे काम सुरु होत नाही तो पर्यंत संपादित शेत जमिनीमध्ये पिक घेण्यास परवानगी द्यावी आदी मागण्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वातीने त्यांनी केल्या आहेत.त्याबाबत प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,नायब तहसीलदार कोतवाल यांना शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या व येत असेलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे योग्य मूल्य प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना तातडीने मिळावे यासाठी प्रयत्न करावे.समृद्धी सर्कल जेऊर कुंभारी व कोकमठाण या परिसरात नगर मनमाड राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी होणार आहे त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांचे किती क्षेत्र जाणार व कुठले जाणार याची माहिती द्यावी व सर्वच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून द्यावा अशा सूचना आ.काळे यांनी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close