जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोकुळनगरी पुलाचे उदघाटन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या व प्रतिकुल काळात काळात उपयोगी येणाऱ्या गोकुळ नगरी पुलाचे उदघाटन आज सकाळी कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

कोपरगाव शहर हद्दीत गोकुलनगरी या उपनगर व परिसरातील नागरिकांना सन-२००६ साली गोदावरी नदीस मोठा पूर आला त्यावेळी शहराच्या वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.खंडकनाला समता पतसंस्थेजवळ महापुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा श्वास कोंडला होता.त्यावेळी पूर रेषा आखण्यात येऊन नागरिकांना आपल्या घराची कामे करताना खबरदारी घेण्याचे प्रशासनाने सांगितले होते. व पुराच्या काळात शासनाने गोकुलनगरी जवळ सुमारे ३७ लाख ११ लाख रुपयांचा पूल मंजूर केला होता.

कोपरगाव शहर हद्दीत गोकुलनगरी या उपनगर व परिसरातील नागरिकांना सन-२००६ साली गोदावरी नदीस मोठा पूर आला त्यावेळी शहराच्या वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.खंडकनाला समता पतसंस्थेजवळ महापुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा श्वास कोंडला होता.त्यावेळी पूर रेषा आखण्यात येऊन नागरिकांना आपल्या घराची कामे करताना खबरदारी घेण्याचे प्रशासनाने सांगितले होते. व पुराच्या काळात शासनाने गोकुलनगरी जवळ सुमारे ३७ लाख ११ लाख रुपयांचा पूल मंजूर केला होता.त्याचे काम येथील ठेकेदार कैलास भुतडा यांनी घेतले होते ते नुकतेच पूर्ण केले आहे.त्याचे उदघाटन आज आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले होते.ते आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे,कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,नगरसेवक मंदार पहाडे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे, प्रशांत वाबळे,ठेकेदार कैलास भुतडा व मुकुंद भुतडा,सलीम पठाण,बाळासाहेब औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.या पुलाची उंची पूर रेषेपेक्षा किमान दीड मीटर उंच घेतली असल्याची माहिती उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे आता गोदावरीस कितीही पूर आला तरी शहराचा संपर्क तुटू शकणार नाही असेही ते शेवटी म्हणाले आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close