कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारींगावचे सुपुत्र निवृत्त सैनिक मेजर प्रदीप ज्ञानेश्वर टेके यांचे हस्ते वारी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे.वारीचे सरपंच सतिष कानडे यांनी गेल्या वर्षी पासुन वारीचे सुपुत्र असणाऱ्या निवृत्त सैनिकांना हा बहुमान दिला आहे त्यांच्या या निर्णयाचे वारी ग्रामस्थांकडुन कौतुक केले जात आहे.
स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
देशभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले असताना त्याला वारी ग्रामपंचायत अपवाद नव्हती या ठिकाणी साथ पसरण्याचा धोका असल्याने शालेय विध्यार्थी उपस्थित करण्यात आले नव्हते.कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सुरक्षित नियमांचे पालन करत सर्व प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक कराळे सर,प्राथमिक आरोग्य केंद्र वारी येथे पंचायत समिती सदस्य मधुकर टेके तर रामेश्वर विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक सुनिल निकाळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर रामेश्वर विद्यालाय येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती मच्छिंद्र टेके,माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,सरपंच सतिष कानडे,उपसरपंच मनीषा गोर्डे,ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे,विशाल गोर्डे,प्रशांत संत,प्रकाश गोर्डे,सचिन टेके आदींसह ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते