कोपरगाव तालुका
कोपरगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन आज सकाळी उत्साहात संपन्न झाला आहे.या वेळी प्रमुख आकर्षण असलेल्या कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला तर कोपरगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी राष्ट्रध्वज फडकावुन त्यास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे यांनी मानवंदना दिली आहे तर कोपरगाव पंचायत समितीत सभापती पौर्णिमा जगधने यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे.तर नगरपरिषदेच्या माधवराव आढाव विद्यालयात स्वच्छता कर्मचारी सुंदराबाई गवळी यांना तर पालिकेत पालिकेचे कोरोना योध्ये यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी यांना अध्यक्ष विजय वहाडणे यांनी संधी दिली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी कोरोना साथीच्या प्रतिकूल कालखंडात आपली वैद्यकीय सेवा नागरिकांना देऊन त्यांच्या जीविताचे संरक्षण करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.त्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधातेसह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते.१९ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते.१८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन पुकारले दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की,आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे.तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता.ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.त्यामुळे या दिवशी देशभर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यावर्षी या उत्सवावर कोरोना साथीचे सावट असल्याने नागरिकांनी या वेळी उपस्थिती मर्यादित होती.
तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या प्रमुख सोहळ्यास आ.आशुतोष काळे,नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, संजीवनी कारखान्याचे बिपीन कोल्हे,काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,उपसभापती अर्जुन काळे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अशिकरी डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,प्रशांत वाबळे आदी प्रमुख मान्यवरांसह नगरपरिषद व पंचायत समिती,तहसील,तालुक्यातील प्रमुख आस्थापने आदींचे अधिकारी व कर्मचारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या वेळी कोरोना साथीच्या प्रतिकूल कालखंडात आपली वैद्यकीय सेवा नागरिकांना देऊन त्यांच्या जीविताचे संरक्षण करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.तर कोविड-१९ या साथीचा आपण कसा सामना केला याचा अनुभव डॉ.मंजुषा गायकवाड यांनी विशद केला आहे.उपस्थितांचे आभार स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी मानले आहे.