जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ठेकेदाराचा हलगर्जीपणा,मजूर ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या साई धाम कमानी जवळ असललेल्या एका बांधकामावर मजुराला डोक्यात घालण्यास हेल्मेट न दिल्याने मजूर नितीन अनिल इंगळे (वय-३०) हा गंभीर जखमी झाला असून उपचारा दरम्यान नुकताच ठार झाला आहे.या प्रकरणी कोळपेवाडी येथील आरोपी ठेकेदार राहुल सोपान धनवटे याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादीची पत्नी दुर्गा नितीन इंगळे हिने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र

राज्यात आणलेल्या असंघटीत मजुरांना बांधकामस्थळी मुक्कामी असताना मुलभूत सुविधा,सुरक्षा पुरवण्याची तरतूद इमारत व इतर बांधकाम मजूर (बीओसीडब्लू) कायद्यानुसार करण्यात आलेली आहे.मात्र या कायद्याची पायमल्ली करून बांधकामस्थळी मजुरांकडून काम करून घेतले जाते.त्यामुळे घटनास्थळी अपघात,सर्पदंश,कामात दुखापती होऊन कामगारांना जीव गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्मांण झाली आहे.

राज्यात आणलेल्या असंघटीत मजुरांना बांधकामस्थळी मुक्कामी असताना मुलभूत सुविधा,सुरक्षा पुरवण्याची तरतूद इमारत व इतर बांधकाम मजूर (बीओसीडब्लू) कायद्यानुसार करण्यात आलेली आहे.मात्र या कायद्याची पायमल्ली करून बांधकामस्थळी मजुरांकडून काम करून घेतले जाते.त्यामुळे घटनास्थळी अपघात,सर्पदंश,कामात दुखापती होऊन कामगारांना जीव गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
इमारत बांधकाम उपक्रमात गुंतलेल्या मजुरांनी एकाच ठिकाणी ९० दिवस काम केले,तर त्यांची कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी करून सुरक्षा कीट घेण्याची प्रक्रिया कामगार उपायुक्त,बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांना करावी लागते.मात्र कोपरगाव मधील बांधकाम व्यवसायात परप्रांतीय मजूर आणले जात असल्याने ‘बीओसीडब्लू’ कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे उघड झालेले आहे.

नगर-मनमाड मार्गावर साई लक्ष्मीनगर साई धाम पाटी जवळ घडलेल्या घर बांधकामाच्या घटनेत एक बांधकाम मजूर ठार झालेला आहे.त्यामुळे या मजुरांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात दि.१० नोव्हेंबर रोजी दुपारी ०२ वाजता झाली आहे.साई धाम पाटीजवळ झाली आहे.त्यात ठिकाणी ठेकेदार राहुल धनवटे याचे काम सुरु होते मात्र त्याने तेथील मजुरास हेल्मेट व तत्सम सुरक्षा साधने पुरवली नाही या कारणाने तेथील मजूर नितीन इंगळे हा तेथील झालेल्या अपघातात आधी जखमी झाला आहे.त्याला उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचे दोन दिवसांनी निधन झाले आहे.
सदर घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी मयताची पत्नी फिर्यादी दुर्गा इंगळे हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.३३७/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(अ) प्रमाणे दाखल केला आहे.पुढील ताप्पास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close