कोपरगाव तालुका
सुरेगावात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून हाणामाऱ्या
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादीच्या घरावर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यास सांगितल्याचा राग येऊन आरोपी बाळू अंबु निकम,पवन बाळू निकम,संगीता बाळू निकम यांनी काठी व विटाने मारहाण करून फिर्यादी महिलेच्या सासू पार्वताबाई दामोदर निकम (वय-७०) या महिलेस जखमी केले असल्याची फिर्याद सुरेखा संजय निकम (वय-३४) या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला सुरेखा निकम या आपल्या सासू पार्वताबाई निकम व आपल्या अन्य कुटुंबिया समवेत राहतात.आरोपी बाळू निकम यांच्या शेजारी-शेजारी राहतात.आरोपी बाळू निकम यांच्या घरासमोर एक बकाना निंबाचे मोठे वाढलेले झाड असून त्याच्या फांद्या या फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन त्याचा त्रास होत असल्याने फिर्यादी महिला सुरेखा निकम यांनी व त्यांच्या सासूबाई पार्वताबाई निकम यांनी आक्षेप घेतला.त्यातून हे भांडण झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी महिला सुरेखा निकम या आपल्या सासू पार्वताबाई निकम व आपल्या अन्य कुटुंबिया समवेत राहतात.आरोपी बाळू निकम यांच्या शेजारी-शेजारी राहतात.आरोपी बाळू निकम यांच्या घरासमोर एक बकाना निंबाचे मोठे वाढलेले झाड असून त्याच्या फांद्या या फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन त्याचा त्रास होत असल्याने फिर्यादी महिला सुरेखा निकम यांनी व त्यांच्या सासूबाई पार्वताबाई निकम यांनी आक्षेप घेतला.त्यांच्यात या विषयावरून वादंग झाले व त्याला आरोपी आरोपी बाळू अंबु निकम,पवन बाळू निकम,संगीता बाळू निकम यांनी हरकत घेतली व त्यावरून दोन्ही गटात हाणामारी होऊन त्यात आरोपीनी फिर्यादी महिला सूरेखा निकम व त्यांच्या सासूबाई पार्वताबाई निकम यांना काठी व विटाने मारहाण करून जखमी केले. हि घटना ३० जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.यात फिर्यादी महिलेच्या सासूबाई गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना रुग्णालयात भरती केले होते त्या नंतर त्यांनी आज हि फिर्यादी नोंदवली आहे.त्यात फिर्यादी महिलांना त्यांनी विट व काठीने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून त्यानां घाण-घाण शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व आमचे किराणा दुकान जर फुटले तर तुमचेच नाव घेऊ अशी धमकी दिली असल्याची फिर्याद दाखल केलेली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.२६/२०२० भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,५०६ सह ३४ प्रमाणे आपल्या दप्तरी वरील तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.अर्जुन बाबर हे करीत आहेत.