आरोग्य
कोपरगावसह शिंगणापुरमध्ये आणखी रुग्ण !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा विक्रम स्थापित झाला असून आज १७५ रॅपिड चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात कोपरगाव सह ३० रुग्ण बाधित निघाले असताना आज सकाळी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवलेल्या १६ श्रावांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात २ रुग्ण बाधित आढळले आहे तर १४ संशयित रुग्ण निरंक आले असून बाधितांत खडकी येथील ३८ वर्षीय पुरुष व शिंगणापूर येथील २७ वर्षीय तरुणांचा समावेश असल्याने गत २४ तासात बाधित रुग्णांची संख्या ३२ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
काल पासून आजपर्यंत २४ तासात करण्यात आलेल्या तपासण्या नंतर आता बाधित रुग्णांची संख्या २१४ पर्यंत पोहचली आहे.त्यात सक्रिय रुग्णांची संख्या १२४ इतकी आहे तर आज पर्यंत १ हजार ६२१ रुग्णांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली आहे.आतापर्यंत तीन रुग्णांचा बळी या साथीत गेला आहे.त्यामुळे आता नागरिकांना अधिकची दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ५६ हजार ६२६ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १९ लाख ६३ हजार २३९ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ३० हजार ७३९ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा काल दिवसभरात १० हजार ३०९ ने वाढून ४ लाख ६८ हजार २६५ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १६ हजार ४७६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ हजार ९०७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ८१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून तीन बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह या पूर्वीच २१२ रुग्ण बाधित झाले आहेत.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे मंजूर,पढेगाव,करंजी,सुरेगाव पाठोपाठ आता धारणगाव व आता येसगाव व कोळपेवाडी,पोहेगावातही मोठ्या प्रमाणावर पोहचली असल्याचे स्पष्ट होत आहे.
काल पासून आजपर्यंत २४ तासात करण्यात आलेल्या तपासण्या नंतर आता बाधित रुग्णांची संख्या २१४ पर्यंत पोहचली आहे.त्यात सक्रिय रुग्णांची संख्या १२४ इतकी आहे तर आज पर्यंत १ हजार ६२१ रुग्णांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली आहे.आतापर्यंत तीन रुग्णांचा बळी या साथीत गेला आहे.त्यामुळे आता नागरिकांना अधिकची दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.