कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात पुन्हा मोठी रुग्णांची वाढ !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आज पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची मोठी वाढ झाली नव्याने आठ रुणांची त्यात भर पडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे आता नव्याने तालुका प्रशासनावर पुन्हा अतिरिक्त कोरोना बाधितांचा भर वाढला आहे.वाढलेल्या रुग्णांत लक्ष्मीनगर येथील एक ५० वर्षीय पुरुष,व एक ४५ वर्षीय पुरुष असे दोघे तर सुरेगाव येथील २७ वर्षीय पुरुष,शिंदे-शिंगीनगर येथील ४९ वर्षीय पुरुष,व एक ३६ वर्षीय महिला,या खेरीज स्वामी समर्थनगर येथील ५४ वर्षीय महिला व २१ वर्षीय पुरुष व एक ६६ वर्षीय महिला आदी ८ नागरिकांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात नव्याने तालुका प्रशासनावर पुन्हा अतिरिक्त कोरोना बाधितांचा भर वाढला आहे.वाढलेल्या रुग्णांत लक्ष्मीनगर येथील एक ५० वर्षीय पुरुष,व एक ४५ वर्षीय पुरुष असे दोघे तर कोळपेवाडी येथील २७ वर्षीय पुरुष,शिंदे-शिंगीनगर येथील ४९ वर्षीय पुरुष,व एक ३६ वर्षीय महिला,या खेरीज स्वामी समर्थनगर येथील ५४ वर्षीय महिला व २१ वर्षीय पुरुष व एक ६६ वर्षीय महिला आदी ८ नागरिकांचा समावेश झाला आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०३ हजार ३८२ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १५ लाख ३५ हजार ५१६ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ३४ हजार २५२ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख ९१ हजार ४४० वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १४ हजार १६५ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०३ हजार ६४६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून दोन बळी गेले आहे.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः कोपरगाव शहरात कोरोनाची संकट हे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व परीचारिकांवर जास्त प्रमाणात जास्त प्रमाणावर कोसळत आहे.त्यात आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोपरगाव शहरात नव्याने तालुका प्रशासनावर पुन्हा अतिरिक्त कोरोना बाधितांचा भर वाढला आहे.वाढलेल्या रुग्णांत लक्ष्मीनगर येथील एक ५० वर्षीय पुरुष,व एक ४५ वर्षीय पुरुष असे दोघे तर सुरेगाव येथील २७ वर्षीय पुरुष,शिंदे-शिंगीनगर येथील ४९ वर्षीय पुरुष,व एक ३६ वर्षीय महिला,या खेरीज स्वामी समर्थनगर येथील ५४ वर्षीय महिला व २१ वर्षीय पुरुष व एक ६६ वर्षीय महिला आदी ८ नागरिकांचा समावेश झाला आहे.
नजीक शिर्डीत या रुग्णांनी पन्नाशी कधिच ओलांडली आहे.राहाता,वैजापूर,येवला,औरंगाबाद नाशिक,संगमनेर,मालेगाव आदी ठिकाणी कहर उडाला आहे.कोपरगाव तालुक्यात कोपरंगवसह सुरेगावात उच्चांक झालेला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.अद्यापही काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.आता पोलिसानी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला आहे.