शैक्षणिक
महात्मा गांधी विद्यालयाचा एस.एस.सी निकाल १०० टक्के
संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचा शाळांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो १०० टक्के लागला आहे यशस्वी वियद्यार्थ्यांसाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या निकालात प्रथम क्रमांक चेचरे शिवम शरद याने ८९ %,गुण मिळवून पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक चेचरे ओंकार रावसाहबे ८७.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे, तर तृतीय क्रमांक टाचतोडे ओम नारायण ८४.८० % गुण मिळवून पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील,उत्तर विभागीय अध्यक्ष आ. आशितोष काळे,सहसचिव नागपुरे एस.बी.,जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील,एकनाथ घोगरे पाटील,बी जी आंधळे,सहा.इन्स्पेक्टर शेंडगे के.के.,सरदार बी.बी.,प्राचार्य मधुकर अनाप, मुख्याध्यापिका सौ. सोनार सी.एस., पर्यवेक्षक सौ.ब्राम्हणे व्ही.एस.,माळी डी.एन.,सर्व समितीचे सदस्य,पालक,सेवक वृंद आदींनी अभिनंदन केले आहे.