कोपरगाव तालुका
शेतकरी अर्थसंपन्न व्हावा हीच सरकारची इच्छा-माहिती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील शेतकरी समुद्ध होवून आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते.हे स्वप्न पूर्ण व्हावे या साठी महाविकास आघाडी सरकार वाटचाल करीत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे १ जुलै ते ७ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाचा सांगता समारंभ नुकताच कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कृषी शास्त्रज्ञ भरत दवंगे,उपविभागीय कृषी अधिकारी श्री. बोराडे,कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,सरपंच वैशाली आभाळे,मोहनराव आभाळे,उत्तम कुऱ्हाडे,श्रीधर आभाळे,सोपान आभाळे,रोहिदास होन,राहुल रोहमारे,सुभाष आभाळे,राहुल जगधने,भाऊसाहेब कुऱ्हाडे,माधव आभाळे,हरिभाऊ जावळे,विठ्ठल जावळे,रंभाजी आभाळे,प्रमोद आभाळे,नामदेव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जान असणारे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे.मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने सरकारकडून १९.६७ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली.चालू हंगामात शेतकऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची दखल घेवून बियाणे उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांना निवीन बियाणे देण्यास भाग पाडले.काही बियाणे उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई देखील केली.कृषी विभागाने शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर घेवून गेले तरच शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे.त्यादृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करावे असे आवाहन आ.काळे यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.