कोपरगाव तालुका
हिंगणीतील राघोबादादा वाड्यात प्रेमी युगलांची वर्दळ !
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोरोना संसर्गाचा पाश्र्वभुमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे प्रेमी युगलांचे भेटी गाठीचे सर्व रस्ते बंद झाले आहेत मात्र कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील तिन भिंतीचा वाडयातील राघोबादादा यांच्या समाधीस्थळ परिसरात प्रेमी युगलांची तसेच हुल्लडबाज पर्यटकांची वर्दळ वाढल्याने हिंगणी ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत आलेल्या राघोबादादां पेशवे यांचा वाडा आहे.हा गावाबाहेर गोदावरी नदीच्या काठी असुन वाडयाच्या एका बाजुला शेतजमिनी तर दुसऱ्या बाजुला गोदावरी नदी व दाट काटेरी झुडपे आहेत या रस्त्यावर वर्दळ तशी कमीच असते.याचा फायदा घेत प्रेमी यूगलांनी आपला मोर्चा हिंगणी गावाबाहेरील निर्जन अशा उघड्या भिंतीचा वाडयात वळवला असुन भेटीगाठींचा जनु अड्डाच बनवला आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत आलेल्या राघोबादादां पेशवे यांचा वाडा आहे.हा गावाबाहेर गोदावरी नदीच्या काठी असुन वाडयाच्या एका बाजुला शेतजमिनी तर दुसऱ्या बाजुला गोदावरी नदी व दाट काटेरी झुडपे आहेत या रस्त्यावर वर्दळ तशी कमीच असते.याचा फायदा घेत
प्रेमी यूगलांनी आपला मोर्चा हिंगणी गावाबाहेरील निर्जन अशा उघड्या भिंतीचा वाडयात वळवला असुन भेटीगाठींचा जनु अड्डाच बनवला आहे.या ठिकाणी प्रेमी युगुल राजरोसपणे गळ्यात गळे घालुन अश्लील चाळे करताना येथे आढळुन येतात.या प्रकारामुळे सदर ठिकाणी अनैतिक संबंधातुन खुन,आत्महत्या,तसेच लुटालुट असे गुन्हे घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.तसेच काही हुल्लड बाज तरूण तरुणी वाड्याच्या उंच भिंति वरून चढुन मोबाईल वर सेल्फी काढणे भिंतीवरून धावणे असे प्रकार करत असतात यामुळे नकळत तोल जाउन शरीराची मोडतोड तसेच प्राण गमावण्याची वेळ येउ शकते सदर ठिकाणी या अगोदर अशा प्रकारचे अपघात घडले असुन ग्रामस्थ तसेच सरपंच व पोलीस पाटील यांनी अशा मंडळींना हुसकावुन लावण्यात यश मिळवले असुन प्रसंगी, सदर मंडळी कडुन बाचाबाची तसे धमकावण्याचे प्रकार घडल्याची माहीती गावचे पोलीस पाटील कुमारपंडीत पवार यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.तरी प्रशासनाने यात लक्ष घालुन सार्वजनिक ठिकाणी अश्या प्रकारे अश्लील प्रकार करणाऱ्या प्रेमियूगलांचा व हुल्लडबाज पर्याटकांचा बंदोबस्त करावा अशी विनंती दत्तात्रय पवार यांनी केली आहे.