जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

साडे तीन वर्षांत ११०० कोटीपेक्षा जास्त निधी-…या नेत्याचा दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवून मागील साडे तीन वर्षांत ११०० कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे.या निधीतून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साकारतांना करण्यात आलेली विकासकामे दीर्घकाळ टिकली पाहिजे यासाठी गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला चालना देवून केलेल्या विकासकामांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी ही विकासकामे दर्जेदार होवून दीर्घकाळ टिकणे गरजेचे आहे.त्यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले आहे”-आ.आशुतोष काळे.कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या जि.प.शाळा ते महालखेडा,काळधोंडी नदी ते तालुका हद्द रस्त्याचे डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व ९.७५ लक्ष रुपये निधीतून फिजिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रिडा साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच त्यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी बाळासाहेब कदम,अशोकराव काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कदम,शरद पवार पतसंस्थेचे संचालक महेंद्र काळे,गणेश घायतडकर,तान्हाजी कदम,सुदाम भुसे,साहेबराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की,”मतदार संघाच्या विकासाला चालना देवून केलेल्या विकासकामांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी ही विकासकामे दर्जेदार होवून दीर्घकाळ टिकणे गरजेचे आहे.त्यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close