जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात..या विद्यालयाच्या वतीने मुखपट्यांचे वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज श्रीमान गोकुळचंद विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशी व डाॕक्टर दिना निमित्तानं नागरिकांना खिचडी ऐवजी कोरोना विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी मुखपट्याचे वाटप करण्यात आले आहे.

कोपरगांव शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि दुसरी कडे नागरीकांमधील वाढत जाणारी बेफिकीरी आणि निष्काळजीपणा लक्षात घेवुन त्यांच्यामध्ये कोरोनाची या आजाराची जाणिव जागृती व्हावी म्हणून आज डाॕक्टर दिन व आषाढी एकादशीच्या च्या निमित्तानं श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांने मुखपट्टीचे शहरातील अहिंसा चौका जवळ वाटप करण्यात आले आहे.

याप्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीपकुमार अजमेरे,विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते मुखपट्टीचे वाटप करण्यात आले.या वेळी डी.व्ही.तुपसैंदर,आर.बी.गायकवाड,एस.डी.गोरे,ए. जे.,कोताडे,शैलेश गाडेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अहिंसा हस्तकला केंद्राच्या शोभना ठोळे,डाॕक्टर दीनाच्या निमित्तानं डाॕ.अजेय गर्जे,डाॕ.आदीक,डाॕ.सोनवणे,डाॕ.आव्हाड,आणि प्रसिध्द व्यापारी विरेन अग्रवाल आदी मान्यवर या मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संयोजन एस.डी.गोरे यांनी केले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close