जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवावर कोरोनाची छाया

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक ०४ जुलै ते सोमवार दिनांक ०६ जुलै या काळात श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत असून कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे. या निमित्‍ताने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्री साईआश्रम येथे भव्‍य रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या वर्षी देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे दि.०४ जुलै ते दि.०६ जुलै २०२० या कालावधीत साजरा करण्‍यात येणारा श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.याकालावधीत कुठलेही सांस्‍कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्‍यात आलेला आहे.

श्री.डोंगरे म्‍हणाले,या वर्षी देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे दि.०४ जुलै ते दि.०६ जुलै २०२० या कालावधीत साजरा करण्‍यात येणारा श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.याकालावधीत कुठलेही सांस्‍कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्‍यात आलेला आहे.
श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक ०४ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.१५ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०५.३० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी. ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार दिनांक ०५ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.२५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक ०६ जुलै पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे मोठयाप्रमाणात रक्‍ताची उणीव भासत आहे. याकरीता श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍ताने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी दिनांक ०५ जुलै रोजी सकाळी ०९.०० ते सायं.०५.०० वाजेपर्यंत श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथे भव्‍य रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच ज्‍या रक्‍तदात्‍यांना प्‍लाझ्मा या रक्‍त घटकाचे दान करावयाचे आहे, अशा दात्‍यांनी आपली नावे श्री साईनाथ रक्‍तपेढी, शिर्डी येथे नोंदवावी. याकरीता मो.नं.८६६९१४०६९३ व ०२४२३-२५८५२५ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी रक्‍तदान करणा-या इच्‍छुक रक्‍तदात्‍यांनी व संस्‍थान कर्मचा-यांनी या शिबीरात सहभागी व्‍हावे असे आवाहन श्री.डोंगरे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close