जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात..त्या शेतकऱ्यांना मिळणार नवीन बियाणे !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या महाबीज व ग्रीनगोल्ड कंपनीचे बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता या बियाणांची उगवण झाली नसल्याचे निदर्शनास आले असून ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाहीत त्या शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार महाबीज कंपनी चे नवीन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवले नाहीत अशा शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी व महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात केले आहे.

शेतकऱ्यांनी खरेदी केलेली महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने कृषी अधिकारी,संबंधित कंपनीचे अधिकारी व तक्रारदार शेतकरी यांची तर संयुक्त बैठक घेतली होती.त्यानंतर बियाणे संशोधक यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी पेरणी केलेले सोयाबीनचे पिक उगवण न झाल्याचे आढळून आले होते.त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.


प्रसिद्धी पत्रकात आ.काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,मतदार संघातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेली महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने कृषी अधिकारी,संबंधित कंपनीचे अधिकारी व तक्रारदार शेतकरी यांची तर संयुक्त बैठक घेतली होती.त्यानंतर बियाणे संशोधक यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी पेरणी केलेले सोयाबीनचे पिक उगवण न झाल्याचे आढळून आले.पेरणीचा मोसम निघून जावू नये व शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेत नवीन बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडे व महाबीजकडे त्याबाबत पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्यास यश मिळाले असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत अशा शेतकऱ्यांना महाबीज कंपनीमार्फत नवीन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी दुकानातून खरेदी केलेली बियाणे निकृष्ट दर्जाची निघाली आहे अशा शेतकऱ्यांना तक्रार निवारण समिती अहवालानुसार शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी बिल,आधार कार्ड,बियाण्याच्या पिशवीला असलेल्या लेबलची झेरॉक्स घेऊन बियाणे त्या त्या दुकानातून उपलब्ध होणार आहे. तसेच इतर कंपन्याशी संपर्क करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close