जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील..त्या बारा पैकी आठ अहवाल प्राप्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ संशयित रुग्णापैकी आठ जणांचे अहवाल नगर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते ते नुकतेच आज सकाळी प्राप्त झाले असून ते निरंक आले असून चार जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे प्रशासनाने समाधान व्यक्त केला आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पैकी चार जण जास्त जोखमीचे असून पाच जण कमी जोखमीचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली होती.या खेरीज कोपरगाव शहरात आढळलेल्या एका महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६ संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.शहर व तालुका मिळून बारा जणांचे अहवाल नगर येथील तपासणी केंद्रात पाठवले होते.त्यातील आठ जणांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून ते आठही संशयित निरंक आल्याने प्रशासनाने समधान व्यक्त केले आहे.

देशभर अद्याप कोरोनाचा कहर सुरूच असून कोपरगाव तालुक्यात १० एप्रिल नंतर एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता एकही रुग्ण शिल्लक नव्हता मात्र दि.२० जून रोजी करंजी ग्रामपंचायत हद्दीतील मात्र येवला व वैजापूर आदी ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी हे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते व त्यांच्या संपर्कात आलेला त्यांचा चांदवड येथे नोकरी करत असलेला मुलगा घरी आल्याने तो ही कोरोना बाधित असल्याचे नाशिक जिल्ह्याच्या यादीत निष्पन्न झाल्याने कोपरगाव तालुका प्रशासन खडबडून जागे झाले होते.त्यामुळे तालुका प्रशासनाने तातडीने करंजी गावात हजेरी लावून गावात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पैकी चार जण जास्त जोखमीचे असून पाच जण कमी जोखमीचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली होती.या खेरीज कोपरगाव शहरात आढळलेल्या एका महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६ संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.शहर व तालुका मिळून बारा जणांचे अहवाल नगर येथील तपासणी केंद्रात पाठवले होते.त्यातील आठ जणांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून ते आठही संशयित निरंक आल्याने प्रशासनाने समधान व्यक्त केले आहे.अद्याप चार जणांचे अहवाल प्रतीक्षेत असून त्याकडे कोपरगाव तालुक्याचे व कोपरगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close