कोपरगाव तालुका
..या संस्थेत येथे योगदिन उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठान येथील आत्मामालिक ध्यानपिठ व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या वतीने जागतिक योग दिन ऑनलाईन लाईन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या योगा ध्यान साधनेमध्ये हजारो विद्यार्थी, पालकांनी प्रात्यक्षिके करण्यासाठी सहभागी झाले होते.
योग दिना निमित्ताने ऑनलाईन योगाचे धडे संत योगानंद महाराज समवेत कु. साक्षी पवार व दिपक पवार यांनी प्रत्यक्ष योगा करून लाईव्ह दाखवित असताना राज्यासह देशातील तब्बल दहा हजार पेक्षा ज्यास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक,भाविकांनी योगाचे प्रात्यक्षिके करत योग दिन साजरा करीत आपला सहभाग नोंदवला आहे.
करोना संसर्गजन्य विषाणुची लागण होवू नये म्हणुन प्रशासनाने सर्व शाळा बंद ठेवल्या तरी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांना जागतीक योग दिना निमित्य घरबसल्या योगाचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या माध्यमातुन रविवारी सकाळी सहा वाजता घेण्यात आला.आश्रमाचे योग गुरु योगानंद महाराज,आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन कांतीलाल पटेल प्राचार्य नामदेव डांगे,बाळासाहेब कोतकर,संदीप गायकवाड,माणिक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत योगसाधनेचा शुभारंभ करण्यात आला.
योग गुरु योगानंद महाराज यांनी सर्वांना योगाचे धडे देताना म्हणाले कि,योगामुळे माणसाचे शरीर,मन,विचार,कृती,संयम व तृप्तता यांचा मिलाफ साधला जातो. योगाचा मूळ अर्थच शरीर व मनाचा समन्वित संगम असा आहे.सध्याच्या करोनाच्या काळात योगाचे महत्त्व अधिक वाढले आणि ते जगाने स्वीकारले. म्हणूनच आज जगभर योगाचे धडे गिरवले जात आहेत. त्याची महती अधिक वाढावी, यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात मुलांना दररोज ध्यान योगाचे धडे दिले जातात.देशाची भावी पिढी सक्षम, सुदृढ व निरोगी होण्यासाठी ओमगुरूदेव माऊलींनी आत्मचिंतन,ध्यान धारणा आणि योग साधनेची शिकवण दिली आहे. हा त्यांचा संदेश जगात प्रभावी ठरत आहे असेही संत योगानंद महाराज यांनी सांगितले. दरम्यान योग दिना निमित्ताने ऑनलाईन योगाचे धडे संत योगानंद महाराज समवेत कु. साक्षी पवार व दिपक पवार यांनी प्रत्यक्ष योगा करून लाईव्ह दाखवित असताना राज्यासह देशातील तब्बल दहा हजार पेक्षा ज्यास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक,भाविकांनी योगाचे प्रात्यक्षिके करत योग दिन साजरा करीत आपला सहभाग नोंदवला.
ऑनलाईन लाईव्ह जागतीक योग दिना सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आश्रमाचे सर्व संत मांदियाळी,अध्यक्ष,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस,सर्व विश्वस्त,पदाधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब कोतकर, अजित पवार, शेषेंद्र त्रिपाठी, रविंद्र बेंद्रे, सुरेश शिंगोटे, जया जगताप, किशोर पवार, अर्जुन खेकडे, शिवाजी शिरसाट, विजय चाळक, सुनील गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले.