जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणांचा मृत्यू,कोपरगाव पोलिसात नोंद 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव हद्दीतील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ बाळासाहेब जाधव (वय-२६) तरुण नुकताच गोदावरी नदीच्या पुलाजवळ पूर्वेस मृत अवस्थेत आढळून आला आहे.त्यामुळे कान्हेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे.

कान्हेगाव येथील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ जाधव हा रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मृत आढळून आला आहे.त्याची ओळख पटल्यावर त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ जाधव हा रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मृत आढळून आला आहे.त्याची ओळख पटल्यावर त्यास कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले आहे.दरम्यान सदर तरुण या व्यसनी असल्याचे हि आपत्ती ओढवली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली  व पोलीस हे.कॉ.एस.एन.शेख यांनी भेट दिली आहे.
              
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रं.६६/२०२३ सी.आर.पी.सी १७४  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.शेख हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close