जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

फुग्याच्या टाकीचा स्फोट,जीवित हानी नाही,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचे उपनगर असलेलले टिळकनगर येथे लक्ष्मीमाता मंदिर नजीक आज सकाळी अवैधरित्या भरलेल्या फुगे भरण्याच्या टाकीचा घरासमोर स्फोट झाला मात्र सुदैवाने जवळ कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही मात्र कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दाखल घेऊन या टाकीचा मालक आनंद सुखदेव राक्षे याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आनंद राक्षे याने आपल्या घरासमोर अवैध मार्गाने मिळवलेली गॅसची टाकी आपल्या फुग्याच्या व्यवसायासाठी भरून ठेवलेली होती सकाळी ति खाली पडून तीचा अचानक स्फोट झाला. या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी एक जुनी पुराणी गॅसची टाकी आपल्या तोंडाजवळ फुटलेली आढळली.काही सजग नागरिकांनी हि घटना शहर पोलिसांच्या लक्षात आणून दिली.

कोपरगाव शहर हद्दीत फुग्यांवाल्यांचा सुळसुळाट झाला असून ते फुग्यासाठी अवैध मार्गाने गॅसची टाकी बनवून घेतात त्या बाबत त्यांच्याकडे कुठलीही व कोणत्याही विभागाची परवानगी नसते.त्यातून बऱ्याच वेळा अपघात होण्याची दाट शक्यता असते.नुकतीच अशीच घटना कोपरगाव शहरात असलेल्या टिळकनगर परिसरात लक्ष्मी माता मंदिर परिसरात सकाळी सहाच्या सुमारास घडली असून आरोपी आनंद राक्षे याने आपल्या घरासमोर अवैध मार्गाने मिळवलेली गॅसची टाकी आपल्या फुग्याच्या व्यवसायासाठी भरून ठेवलेली होती सकाळी ति खाली पडून तीचा अचानक स्फोट झाला. या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी एक जुनी पुराणी गॅसची टाकी आपल्या तोंडाजवळ फुटलेली आढळली.काही सजग नागरिकांनी हि घटना शहर पोलिसांच्या लक्षात आणून दिली त्यावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी आढळून आली. त्यांनी त्याबाबत चौकशी केली असता आरोपीने आपल्या फायद्यासाठी गैर मार्गाने टाकी उपलब्ध करून ती घरासमोर नागरिकांना इजा पोहचू शकते अशा रीतीने ठेऊन निष्काळजीपणा दाखवला व त्यामुळे ती आपोआप पडून तिचा स्फोट झाला आहे.अशा आशयाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.अनिस शेख यांनी आरोपी आनंद राक्षे याचे विरुद्ध गु.र.नं.३०/२०२० भा.द.वि.कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close