जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-परजणेची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोकोपरगांव तालुक्यात सोमवारी दुपारी ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीसह अनेक घरांचे तसेच अन्नधान्याचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने या गंभिर परिस्थितीची दखल घेवून नुकसानग्रस्तांना तातडीने वस्तुरुपात व रोख स्वरुपात शासकीय मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी नुकतीच केली आहे.

कोपरगांव तालुक्यात सर्वच ठिकाणी प्रामुख्याने पूर्व भागात सोमवारी दि. १५ जून रोजी दुपारी सुमारे तीन तासाहून अधिक वेळ अचानक ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी झाली. तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे,खोपडी,भोजडे,कान्हेगांव,तळेगांवमळे,ओगदी आदी गावातील शेतीला अक्षरश: तळ्याचे स्वरुप आले होते. काढणीस आलेली उन्हाळी पिके तसेच शेकडो हेक्टरवर नुकतीच पेरणी केलेली सर्व बियाणे पूर्णपणे वाहून गेली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात राजेश परजणे यांनी पुढे नमूद केले आहे की,”कोपरगांव तालुक्यात सर्वच ठिकाणी प्रामुख्याने पूर्व भागात सोमवारी दि. १५ जून रोजी दुपारी सुमारे तीन तासाहून अधिक वेळ अचानक ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी झाली. तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे,खोपडी,भोजडे,कान्हेगांव,तळेगांवमळे,ओगदी आदी गावातील शेतीला अक्षरश: तळ्याचे स्वरुप आले होते. काढणीस आलेली उन्हाळी पिके तसेच शेकडो हेक्टरवर नुकतीच पेरणी केलेली सर्व बियाणे पूर्णपणे वाहून गेली आहेत.आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकरी,शेतमजुरांची तसेच भूमीहीन लोकांची घरे जमीनदोस्त झाली असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातल्या जीवनावश्यक वस्तुंसह अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झालेली आहे.अशा नुकसानग्रस्त कुटुंबापुढे उपजिविकेचा प्रश्न उभा राहिलेला आहे.एकतर आधीच कोरोनासारख्या साथीमुळे शेतकरी,शेतमजूर आर्थिक अडचणीत असताना त्यात अतिवृष्टीने जोरदार फटका दिल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अशा संकटात नुकसानग्रस्तांना आधार देण्याची गरज असून शासनाने या गंभिर परिस्थितीची दखल घेवून वस्तुरुपात आणि रोख स्वरुपात मदत करण्याबाबत जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय यंत्रणांना आपल्या सूचना व्हाव्यात अशी विनंतीही श्री परजणे यांनी मंत्री महोदयांकडे केली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close