जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या महिला डॉक्टर कोरोना मुक्त,नागरिकांत समाधान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील कोरोना बाधित महिला डॉक्टर या नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेतल्यानंतर त्यांचा अहवाल आता निरंक आला असून त्यांचे कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

कोपरगांव शहरातील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले व लोणी ता.राहाता येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण ११ व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती व त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती.त्यांच्या पैकी आज पाच जणांचे अहवाल निरंक आले असताना एका खाजगी महिला डॉक्टर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती.तिचा अहवाल खाजगी रित्या तपासणीसाठी पाठवला होता.तो बाधित आल्याने कोपगावात खळबळ उडाली होती.

कोपरगांव शहरातील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले व लोणी ता.राहाता येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण ११ व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती व त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती.त्यांच्या पैकी आज पाच जणांचे अहवाल निरंक आले असताना एका खाजगी महिला डॉक्टर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती.तिचा अहवाल खाजगी रित्या तपासणीसाठी पाठवला होता.तो बाधित आल्याने कोपगावात खळबळ उडाली होती.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी पुन्हा धसका घेतला होता.दरम्यान प्रशासनाने संभाजी चौक ते डॉ.बनकर हॉस्पिटल,ग्रामीण रुग्णालय परिसर,साई नगर परिसर आता कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाने बंद केला होता.व त्यांना तातडीने नगर येथील कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.त्यांना निर्धारित वेळेत उपचार करण्यात आला असल्याने त्या कोरोना मुक्त झाल्या आहेत.त्यांचे तहसिलदार योगेश चंद्रे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे,वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,पोलिस निरिक्षण राकेश मानगांवकर, पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close