जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अठरा इंची यंत्राने सोयाबीन पेरणी करावी-कृषी अधिकारी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतीनिधी)

शेतकऱ्यांनी आगामी काळात चांगला पाऊस झाल्यानंतरच अठरा उंची पेरणी यंत्राने आपली सोयाबीन पेरणी करावी असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकतेच केले आहे.

आपण फक्त आपल्या ट्रॅक्टर वरील पेरणी यंत्रामध्ये ओळीतील अंतर १८ इंचावर करावयाचे आहे.आपले उत्पादन ओळीतील आंतर कमी केल्याने घटणार नाही. उलट हवा खेळती राहिल्याने आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फांद्या फुटून झाडावर शेंगांची संख्या वाढणार आहे.पहिला फायदा बियाण्याची बचत होईल.तणनियंत्रणासाठी आपल्याला लहान ट्रॅक्टर चलीत कोळपे अथवा कल्टीवेटर वापरायचे आहे.त्यासाठी कल्टीवेटरचे फनातील अंतर जास्त करून अठरा इंचावर वर करावे.

राज्यात नुकताच पावसाळा सुरु झाला आहे.बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी पाऊस अद्याप होत आहे.तरीही शेतकी पेरण्यासाठी गही करताना दिसत आहे.मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये व पेरणीसाठी पारंपरिक पद्धतीत आपण यापूर्वी नऊ ते बारा इंची पेराणीद्वारे पेरणी करत होतो मात्र त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निष्पन्न झाला आहे.यात पहिली समस्या बियाण्याची बियाणे खूपच महाग आहे आणि सोयाबीन एकरी ३० किलो बियाणे लागते.दुसरी समस्या वेळेवर तण नियंत्रणाची.वेळेवर मजूर भेटत नाहीत.मजुरांची मजुरीचे दर खूप वाढले आहेत.तिसरी समस्या कोणते तण नाशक वापरावे म्हणजे सर्व तणांचा बंदोबस्त होईल ? चौथी समस्या तणनाशकामुळे पिकावर होणारा अनिष्ट परिणाम कसा टाळावा ? पाचवी समस्या तणनाशकाचे जमिनीवर होणारे अनिष्ट परिणाम टाळता येईल का ? सहावी समस्या पीक वाढीच्या अवस्थेत असतांना पावसाने खंड दिला तर काय करावे ? सातवी समस्या जास्त पाऊस झाला तर पाणी साचून पिक खराब होईल ते कसे वाचवावे ? आठवी समस्या पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला तर काय करावे ? या सर्व समस्या वर एकच उपाय आहे तो म्हणजे सोयाबीनची पेरणी १८ इंचावर करणे. पहिला फायदा सोयाबीनचे बियाणे कमी लागेल.बियाण्याची बचत होईल. दुसरा फायदा तणनियंत्रणासाठी मजुरांची गरज पडणार नाही.त्यामुळे मजुरांची समस्या उद्भवणार नाही व मजुरीवर होणारा खर्च टळेल.तिसरा फायदा तण नियंत्रणासाठी तणनाशकाची आवश्यकता भासणार नाही.व त्यावरील खर्च टळेल.चौथा फायदा तणनाशकामुळे पिकावर होणारा अनिष्ट परिणाम टळेल.पाचवा फायदा तणनाशकाचा जमिनीच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टळेल.सहावा फायदा पीकवाढीच्या अवस्थेत पावसाने खंड दिला तरीही पिक तग धरून राहील.सातवा फायदा जास्त पावसामुळे पिकामध्ये पाणी साचले तर त्याचा निचरा होईल.आठवा फायदा पिकामध्ये हवा खेळती राहिल्याने कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी राहील.आता हे सर्व फायदे आपल्याला मिळवायचे असतील यासाठी जास्तीचा काहीच खर्च लागणार नाही. आपण फक्त आपल्या ट्रॅक्टर वरील पेरणी यंत्रामध्ये ओळीतील अंतर १८ इंचावर करावयाचे आहे.आपले उत्पादन ओळीतील आंतर कमी केल्याने घटणार नाही. उलट हवा खेळती राहिल्याने आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फांद्या फुटून झाडावर शेंगांची संख्या वाढणार आहे.पहिला फायदा बियाण्याची बचत होईल.तणनियंत्रणासाठी आपल्याला लहान ट्रॅक्टर चलीत कोळपे अथवा कल्टीवेटर वापरायचे आहे.त्यासाठी कल्टीवेटरचे फनातील अंतर जास्त करून अठरा इंचावर वर करावे.अशाप्रकारे छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आंतर मशागत करता येईल.

दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली तर पिकामध्ये सरी वरंबा तयार होईल.आंतर मशागतीमुळे पिकांमधील तणांचा वेळीच नायनाट करता येईल.त्यामुळे आपल्या पिकातील तण नियंत्रणासाठी मजुरांची अथवा तणनाशकांची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे मजुरांच्या प्रश्नातून, खर्चापासून व तणनाशकाच्या दुष्परिणामांपासून आपल्या पिकाची व जमिनीची मुक्तता होईल.ट्रॅक्‍टरच्या साह्याने तणनियंत्रण करीत असल्याने कमी वेळेत जास्त क्षेत्रावर काम करता येईल.पिकामध्ये सरी-वरंबा तयार होत असल्याने पिकास मातीची भर लागून पावसाने खंड दिला तरीही पिक जोमदार राहुन अवर्षणाच्या स्थितीत तग धरून राहील.जास्त पावसाने पाणी साचले तर ते सऱ्यांवाटे निचरा होईल.पिक सरी-वरंब्यावर व अठरा इंचावर असल्याने पिकामध्ये हवा खेळती राहून कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी राहील तसेच पिकास वाढीस जागा उपलब्ध होऊन झाडावर फुटव्यांची संख्या वाढेल व शेंगांची संख्या वाढेल.कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणीसाठी योग्य अंतर असल्याने फवारणी चांगल्या प्रकारे होईल.आणखी फायदे कमी ओलावा धारण करणाऱ्या जमिनीतही पिक उत्तम येईल.तसेच सखल व भारी जमिनीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होईल.आपण आपल्या घरचे बियाणे वापरत असाल तर सर्व पोत्यातील बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्या.शेजारच्या शेतकऱ्याचे बियाणे विकत घेऊन पेरणी करत असाल तरीही त्याची उगवण क्षमता तपासणी करून घ्या. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवन क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरा.यामुळे आपल्या उत्पादन खर्चात निश्चितच बचत होईल. तसेच बियाणाला पेरणीपूर्वी रायझोबियम व पीएसबी या नत्र व स्फुरद स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.त्यातून आपल्या पिकाची उगवण चांगली होऊन पिकास हवेतील नत्र व जमिनीतील स्फुरद या मूलद्रव्यांची उपलब्धता होईल. यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घ्यावे.अठरा इंचावर सोयाबीन पेरणी करण्याचे तंत्रज्ञान मध्यप्रदेशातील एका शेतकऱ्याने सलग तीन वर्ष आपल्या शेतावर वापरले असल्याचा दावाही कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close