जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आपल्या सुरक्षेसाठी नातेवाईकांना काही काळ दूर ठेवा-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मागील दोन महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही.शासनाकडून टाळेबंदीच्या काही अटी शिथिल करण्यात आल्यामुळे कोरोनाचे केंद्र असलेल्या जिल्ह्यातून अनेक नागरिक कोपरगाव तालुक्यात आपल्या गावी किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे आल्याने व सुख,दु:खाच्या वेळी एकत्र जमल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.यापुढे एकाही नागरिकाला कोरोनाची बाधा होवू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून आपल्या नातेवाईकांना काही काळ दूर ठेऊन आपले आरोग्य जपण्याचे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका बैठकीत केले आहे.

पाचव्या टाळेबंदी मध्ये देखील बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये व पोलीस प्रशासनांमध्ये वादविवाद होत आहे.अशा प्रकारचे वादविवाद टाळून नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे.कोपरगाव तालुक्यात टाळेबंदीच्या काही अटी जरी शिथिल केल्या असल्या तरी उतावीळपणा अंगलट येवून त्याचे विपरीत परिणाम जनतेला भोगावे लागू शकतात-आ. काळे


मागील आठवड्यात कोपरगाव शहरातील महिला डॉक्टरला झालेली कोरोना बाधा व ठाणे येथून आपल्या आजोबा समवेत धोत्रे येथे आलेल्या दोन बहिणींपैकी एक बहिण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते,आदी प्रमुख अधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.प्रशासनाने केलेल्या कडक उपाय योजनांमुळे कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात कोपरगाव तालुक्याची परिस्थिती चांगली होती. लॉकडाऊन १ ते ४ मध्ये ज्याप्रमाणे तालुक्याच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण करण्यात येत होते. त्याप्रमाणे पाचव्या टाळेबंदी मध्ये देखील बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये व पोलीस प्रशासनांमध्ये वादविवाद होत आहे.अशा प्रकारचे वादविवाद टाळून नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे.कोपरगाव तालुक्यात टाळेबंदीच्या काही अटी जरी शिथिल केल्या असल्या तरी उतावीळपणा अंगलट येवून त्याचे विपरीत परिणाम जनतेला भोगावे लागू शकतात याची जाणीव ठेवून नागरिकांनी योग्य काळजी घेण्याच्या सूचना करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आ.काळे यांनी यावेळी केले.धोत्रे येथे व कोपरगाव शहरातील बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात काय काय उपाययोजना केल्या आहेत. व अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यासाठी काही अडचणी येत असल्यास त्याठिकाणी अजून काही उपाययोजना करता येऊ शकतात का? याचा आढावा या बैठकीत आ.काळे यांनी घेतला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close